आरोग्य व शिक्षणब्रेकिंग

शिळगाव स्मशानभूमी मार्गांवरील पाण्याचा तात्काळ निचरा होणार. नगरसेवक बाबाजी पाटील व नगरसेविका अर्चना निलेश पाटील यांच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना

[wps_visitor_counter]

 

संतोष पडवळ – प्रतिनिधी

ठाणे ता ७ जुलै : ठाणे महापालिकेच्या दिवा प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या शिळगाव स्मशानभूमी मार्गांवरील पाण्याचा तात्काळ निचरा करण्याच्या सूचना प्रभाग क्र २९ मधील नगरसेवक बाबाजी पाटील व नगरसेविका अर्चना निलेश पाटील यांनी समितीच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या असून सदर ठिकाणी नगरसेविका अर्चना निलेश पाटील यांनी स्वतः अधिकाऱ्यांना निदर्शनास आणून दिले आहे. सदर मार्गांवर बाजूला भराव झाल्याने पाणी साचले जात असल्याचे निदर्शनास आले असून परिणामी सदर मार्गांवर अंत्यविधीसाठी जाणाऱ्या जनतेला अडथळा निर्माण होत आहे.

शिळगाव स्मशानभूमी मार्गांवरील पाण्याचा तात्काळ निचरा करण्यासाठी जेसीबीद्वारे मार्ग मोकळा करण्यात येईल असे संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले असून सदर मार्गांवर कायम स्वरूपी मार्ग काढण्यात येईल असे नगरसेवक बाबाजी पाटील व नगरसेविका अर्चना निलेश पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे