गुन्हेगारीब्रेकिंग

“क्राईम पेट्रोल मध्ये काम करणाऱ्या अभिनेत्यालाच घातला लाखोंचा गंडा”

[wps_visitor_counter]

 

संतोष पडवळ – प्रतिनिधी

ठाणे ता ६ ऑगस्ट : ….घर देण्याच्या बहाण्याने 25 लाखांची फसवणूक… क्राईम पेट्रोल मध्ये कामं केलेला अभिनेता सतीश नायकोडी यांचं घर घेण्याचं स्वप्न तर पूर्ण झालंच नाही मात्र आता बँकेचे हप्ते भरणही त्यांना कठीण होऊन बसलं आहे. आपल्या हक्काचं घर असावं असं स्वप्न बघणाऱ्या सतीश नायकोडी यांनी डोंबिवलीत असलेल्या वडिलांच्या घरावर कर्ज घेतलं होतं. चाळीतून मोठ्या सोसायटीत घर मिळतंय हे बघून समोरच्या व्यक्तींवर विश्वास ठेवून सतीश यांनी 24.50 लाख रुपये देऊ केले. पण सगळी कागदपत्र बनावट असल्याचे खूप उशिरा लक्षात आल्याने सतीश नायकोडी यांना आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. सरकारी कागदपत्र, शिक्के एवढंच नाही तर समोरचा अधिकारीही बनावट असल्याने घर तर मिळालं नाहीच मात्र आता बँकेचे हप्ते कसे भरायचे ? असा मोठा प्रश्न त्यांना पडला आहे. 40 लाख रुपयांचे कर्ज आणि आगाऊ दिलेली 24.50 लाखांची रक्कम सगळं मातीमोल झाल्यानं त्यांना पोलिसांकडे धाव घ्यावी लागली आहे. या प्रकरणात आपल्याला लवकरात लवकर न्याय मिळावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

4/5 - (2 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे