आरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्र

पावसातही अविरत सेवा देणाऱ्या सफाई कामगारांना मनसेचा आधार! महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रोजगार व स्वयंरोजगार विभागातर्फे नेरळ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना रेनकोट वाटप

[wps_visitor_counter]

 

नेरळ: सुमित क्षिरसागर

नेरळ ता .२९ जुलै २०२६ : पावसाळ्यात प्रतिकूल परिस्थितीची पर्वा न करता नेरळ शहर व परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी अविरतपणे सेवा बजावणाऱ्या सफाई कामगारांच्या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या वतीने कौतुकास्पद उपक्रम राबविण्यात आला. नेरळ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना रेनकोटचे वाटप करून त्यांच्या आरोग्याची आणि सुरक्षिततेची काळजी घेण्याचा सामाजिक संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

पावसाळ्यात मुसळधार पाऊस, चिखल, साचलेले पाणी आणि प्रतिकूल हवामानाची परिस्थिती असतानाही सफाई कामगार आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत असतात. नागरिकांचे आरोग्य आणि परिसराची स्वच्छता अबाधित ठेवण्यासाठी त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत मनसेच्या रोजगार व स्वयंरोजगार विभागाने हा छोटासा पण माणुसकीचा उपक्रम राबविला.

या उपक्रमाच्या माध्यमातून सफाई कामगारांना पावसापासून संरक्षण मिळावे, काम करताना त्यांची गैरसोय होऊ नये आणि त्यांच्या कार्याप्रती समाजामध्ये आदराची भावना निर्माण व्हावी, हा उद्देश असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

या प्रसंगी रोजगार व स्वयंरोजगार अध्यक्ष महेंद्र बैसाणे, महाराष्ट्र राज्य रोजगार व स्वयंरोजगार सरचिटणीस सिद्धी आंगणे, रोजगार व स्वयंरोजगार रायगड जिल्हाध्यक्ष सतीश कालेकर, कर्जत तालुका अध्यक्षा दर्शना कालेकर, मनसे नेरळ शहराध्यक्ष हेमंत भगवान चव्हाण, उपतालुका संघटक जितेंद्र रुठे, विनोद शेंडे, अमोल कालेकर, किरण राणे, किशोर कालेकर, नारायण कालेकर, शाखाध्यक्ष बिरदोले, नमिता कालेकर, पंकज बुंधाटे, भालचंद्र राणे, चंदू राठोड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, पावसाळ्यात प्रतिकूल परिस्थितीतही नागरिकांच्या आरोग्याची व परिसराच्या स्वच्छतेची काळजी घेणाऱ्या सफाई कामगारांसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. सफाई कामगार बंधू-भगिनींच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मनःपूर्वक कौतुक व अभिनंदन व्यक्त करण्यात आले.

या उपक्रमातून केवळ रेनकोटचे वाटप न करता, स्वच्छतेसाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या सफाई कामगारांच्या योगदानाचा सन्मान करण्याचा सकारात्मक संदेश मनसेच्या वतीने देण्यात आला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे