आरोग्य व शिक्षणब्रेकिंगराजकिय

नेरळच्या पाणी-वीज प्रश्नावर सरकार दरबारी आवाज; आमदार महेंद्र थोरवेंच्या मार्गदर्शनाखाली प्रसाद थोरवेंचा पाठपुरावा युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद थोरवेंचे ऊर्जा राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांना निवेदन

[wps_visitor_counter]

 

नेरळ : सुमित क्षिरसागर

कर्जत ता १ ऑगस्ट : नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील पाणीपुरवठा आणि सातत्याने होणाऱ्या खंडित वीजपुरवठ्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पाठपुरावा सुरू करण्यात आला आहे. नेरळ ग्रामस्थांच्या विविध मागण्यांसाठी आमदार महेंद्र थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना उत्तर रायगड जिल्हाप्रमुख प्रसाद मनोहर थोरवे यांनी राज्याच्या ऊर्जा राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांची भेट घेत निवेदन सादर केले.

नेरळ ग्रामपंचायतीच्या वीज बिलासंदर्भात जुलै २००० ते जुलै २०२५ या कालावधीत MSEB विभागाकडून विद्युत शुल्कात १६ टक्के कपात करण्यात आली होती. या कपातीची रक्कम सुमारे १ कोटी ६२ लाख रुपये असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, नेरळ ग्रामपंचायतीकडे सध्या सुमारे १ कोटी ४८ लाख रुपयांचे थकीत वीज बिल असल्याने त्याचा थेट परिणाम पाणीपुरवठा व्यवस्थेवर होत आहे.

१ कोटी ६२ लाखांचा परतावा मिळाल्यास मोठा प्रश्न सुटणार
MSEB विभागाकडून विद्युत शुल्काच्या कपातीचा परतावा तातडीने मिळाल्यास नेरळ ग्रामपंचायतीचे थकीत वीज बिल भागविण्यास मोठी मदत होणार आहे. त्यामुळे वीज बिलाचा प्रश्न मार्गी लागून नेरळ ग्रामस्थांच्या पाणीपुरवठ्याची समस्या दूर करण्यास मोठा हातभार लागेल, अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात आली.

नेरळ परिसरात वारंवार होणाऱ्या खंडित वीजपुरवठ्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर पाणीपुरवठ्याच्या यंत्रणेवरही त्याचा परिणाम होतो. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. ही समस्या लक्षात घेता वीजपुरवठा सुरळीत व अखंडित ठेवण्याबाबतही ऊर्जा विभागाकडे तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.

नेरळच्या विकासासाठी प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न

नेरळ ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या पाणी आणि वीज या मूलभूत सुविधांचे प्रश्न प्राधान्याने सोडविणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित विभागांकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असून, ग्रामस्थांना दिलासा मिळावा यासाठी शासन स्तरावरही प्रश्न मांडला जात आहे.
आमदार महेंद्र थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसाद मनोहर थोरवे यांनी ऊर्जा राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्याकडे निवेदन देत नेरळच्या पाणी व वीज समस्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी केली. विद्युत शुल्काच्या परताव्याचा प्रश्न लवकर मार्गी लागल्यास थकीत वीज बिलाचा भार कमी होऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी मोठी मदत होणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे