आरोग्य व शिक्षणब्रेकिंग

दिवा शहरासाठी वंचित बहुजन आघाडीकडून स्वतंत्र पोलिस स्टेशनची मागणी.

[wps_visitor_counter]

 

संतोष पडवळ – प्रतिनिधी

ठाणे, दिवा ता ९ डिसें : ठाणे महानगर पालिकेच्या वाढत्या लोकसंख्येच्या दिवा शहरासाठी स्वतंत्र पोलीस स्टेशनची दिवा बहुजन वंचित आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. सहा लाखांच्या आसपास लोकसंख्या झालेल्या दिवा शहरात स्वतंत्र पोलीस स्टेशन नसल्यामुळे स्थानिक नागरिकांना कोणतीही मोठी तक्रार नोंदवण्यासाठी मुंब्रा पोलीस स्टेशन येथे जावे लागत असल्याने जनतेचे प्रचंड हाल होत आहेत. यामुळे दिवा शहरातील सर्वसामान्य जनता विशेषतः दलित, वंचित, कामगार, भटके-विमुक्त समाज असुरक्षित वातावरणात जगत आहे. कायदा-सुव्यवस्थेची भीषण अवस्था पाहता दिवा शहराला स्वतंत्र पोलीस स्टेशन देणे ही आता सुविधा नव्हे तर लोकांचा मूलभूत हक्क आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिवा शहरासाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन तात्काळ सुरु करण्यात यावे. परिसरात नियमित कोम्बिंग ऑपरेशन व छापेमारी करून ड्रग्ज, गुंडगिरी व अवैध दारू व्यवहारावर कठोर कारवाई करावी, शाळा, अंगणवाडी, सार्वजनिक स्थळे व गर्दीच्या भागात पोलिसांची गस्त वाढवावी, महिलांच्या सुरक्षिततेसाठी विशेष पोलीस पथक स्थापन करावे. वाईन शॉपच्या परिसरात खुल्या जागेतील मद्यप्राशनावर बंदी घालावी, दिव्यातील नागरिकांना पोलीस तक्रार करण्यासाठी मुंब्रा येथे पाठवण्याची सक्ती बंद करून स्थानिक स्तरावरच तक्रार निवारण व्यवस्था उभारावी असे अध्यक्ष महेंद्र अनभोरे, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ठाणे पोलीस आयुक्तांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. प्रसंगी मिलिंद गवई दिवा विभाग अध्यक्ष, विकास इंगळे कल्याण ग्रामीण विधानसभा, गाथा इंगळे समाज सेविका, अरविंद कदम प्रभाग क्रमांक 27 अध्यक्ष, नितेश इंगोले, महेंद्र अनभोरे ठाणे शहर अध्यक्ष, मोहन नाईक ठाणे शहर महासचिव संदिप खरात ठाणे शहर उपाध्यक्ष, गणेश पवार ठाणे शहर व्यापारी संघटना, डॉ. देवेंद्र कांबळे ठाणे शहर व्याधकीय प्रमुख आणि वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे