ब्रेकिंगराजकिय

अपप्रवृत्तीला दूर ठेवण्यासाठी निवडणुकीला एकत्रितपणे सामोरे जा – सुनील तटकरे. पुष्पा दगडे कर्जत तर अजय सावंत माथेरान नगराध्यक्षपदाचे उमेदवार

[wps_visitor_counter]

 

कर्जत – सुमित क्षिरसागर

कर्जत ता १४ नोव्हें : आम्ही ४५ वर्ष एकत्र होतो. बंधूच्या आजच्या पक्ष प्रवेशाने जुन्या आठवणींना उजाळा मिळत आहे. आजचे पक्ष प्रवेश करताना मी थकलो इतक्या कार्यकर्त्यांचा प्रवेश झाला. पराभवानंतर पुन्हा पक्ष संघटना बांधण्यात यशस्वी ठरत असलेले सुधाकर घारे यांचे संघटन कौशल्य पहिल्या दहा मध्ये आग्रस्थानी आहे. या भागात होत असलेले पक्ष प्रवेश आगामी निवडणुकांसाठी उपयुक्त ठरत आहेत. निवडणुकीच्या निमित्ताने अपप्रवृत्ती दूर ठेवण्यासाठी एकत्रितपणे सज्ज रहा. कर्जत नगरपरिषद नगराध्यक्ष पदासाठी पुष्पा हरिश्चंद्र दगडे आणि माथेरान नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी अजय काशिनाथ सावंत हे उमेदवार असतील.’असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी जाहीर केले.

कर्जत मधील रॉयल गार्डनच्या सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीचे आणि पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कर्जत तालुकाध्यक्ष दीपक श्रीखंडे आणि खालापूर तालुकाध्यक्ष संतोष बैलमारे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. याप्रसंगी पुंडलिक पाटील, जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, प्रदेश उपाध्यक्ष सुनील पाटील, कार्याध्यक्ष अशोक भोपतराव, जिल्हा प्रवक्ते भरत भगत, माजी सभापती एकनाथ धुळे, प्रदेश प्रतिनिधी भगवान भोईर, दत्ता मसूरकर, अश्विनी पाटील, अजय सावंत, जे. पी. पाटील, भगवान चंचे, राम राणे, ऍड. राजेंद्र निगुडकर, अंकित साखरे, शरद कदम, ऍड. पूजा सुर्वे, ऍड. रंजना धुळे, ऍड. स्वप्नील पालकर, हर्षद मोरे आदी उपस्थित होते. एकनाथ धुळे यांनी प्रास्ताविक करताना, ‘ आता भाऊ, भाईंच्या बरोबरच बंधू सुद्धा आपल्यामध्ये आहेत. त्यामुळे आपण त्यांच्या मार्गदर्शनाखाली चांगले काम करू.’ असे स्पष्ट केले.

यावेळी पुंडलिक पाटील, पंकज पाटील, प्रमोद राईलकर, पुष्पा दगडे, दिनेश जाधव, योगेश गायकवाड यांच्या सह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यामध्ये माजी नगरसेवकांचाही समावेश आहे. पंकज पाटील यांनी,
‘माझ्या मनामध्ये आज समिश्र भावनांचा कल्लोळ आहे. वाढवलेली संघटना सोडताना दुःख होत आहे. मी कुठल्याही तिकिटा साठी किंवा कोणत्याही आर्थिक प्रलोभनासाठी पक्षप्रवेश केलेला नाही. गेल्या दीड वर्षांपासून मी पक्षात अस्वस्थ होतो. उगाचच त्यांच्या कुटुंबात वाद नकोत म्हणून मी बाहेर पडलो. आता माझ्यावर दिलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडीन.’ असा शब्द दिला. पंकज पाटील यांना जिल्हा संघटक, ऍड. राजेंद्र निगुडकर यांना विधानसभा प्रवक्ता म्हणून नियुक्ती पत्र देण्यात आले. त्याच प्रमाणे अनेक कार्यकर्त्यांच्याही नियुक्त्या करण्यात आल्या.

भरत भगत यांनी ‘गेल्या सहा वर्षात या मतदार संघात केलेल्या विकास कामांची चौकशी व्हावी. तटकरेंवर टीका करणाऱ्यांचा पांडुरंगा सत्यानाश कर. ‘ अशी टीका केली. सुधाकर घारे यांनी, माझा पराभव झाला असला तरी आमच्या सर्व सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी खूप मेहनत घेतली. माथेरान मध्ये घोडेवाले व रिक्षावाले यांचे भांडण महेंद्र थोरवे यांनी लावली. बंधू पाटील आणि आमचे मतभेद होते. मात्र आम्ही ते सर्व विसरून एकत्र झालो आहोत. त्यामुळे आता कोणताही वाद राहिला नाही. महायुती सोबत जायचा प्रस्ताव दोन महिन्यांपूर्वी मोठा भाऊ म्हणून भारतीय जनता पक्षाला दिला आहे परंतु त्यांचा अजून निरोप आलेला नाही. आजच्या घडीला तीनही नगरपरिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकेल. अशी परिस्थिती आहे.’ असे सांगितले. पुंडलिक पाटील यांनी, पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने बोलताना ‘मी राजकारणातून बाजूला होतो तरी मी स्वस्त बसलो नाही. लोकांची कामे करीत आलो आहे. एखादा माणूस पदावरून गेला कीं त्याची काय काय अवस्था होते ते तुम्हाला माहीत आहे. मी ३२ वर्षांपूर्वी सभापती पदावरून पायउतार झालो. तरी सुद्धा लोकांशी माझी नाळ अजूनही जुळलेली आहे. सुनील तटकरे राजकारणातील जादूगार आहेत. देशाचे गृहमंत्री अमित शहा त्यांच्याकडे स्नेह भोजनासाठी येतात. यात सारे काही आले.’ असे सांगितले. दत्ता मसुरकर, सुनील पाटील, अशोक भोपतराव, दिनेश जाधव आदींनी मनोगते व्यक्त केली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे