क्रिडा व मनोरंजनब्रेकिंग

राज्यस्तरीय कुराश स्पर्धेत दिव्यातील कु. आयुषी केंद्रेने जिंकले रौप्यपदक. उझबेकिस्तान देशाच्या पारंपरिक खेळात ठाणे जिल्ह्याचे वर्चस्व.

[wps_visitor_counter]

 

संतोष पडवळ – प्रतिनिधी

ठाणे ता ३१ मे : कोल्हापूर येथे कुराश असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दि. २९ व ३० मे २०२४ रोजी पार पडलेल्या सब ज्युनिअर स्टेट कुराश चॅम्पियनशिप २०२४-२०२५ मध्ये ठाणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत दिवा शहरातील कु. आयुषी अश्विनी अमोल केंद्रे हिने उत्कृष्ट कामगिरी करत रौप्यपदक पटकावले आहे. तिच्या या यशाबद्दल कु. आयुषी व त्यांचे प्रशिक्षक मुंबई विभाग प्रमुख व कोच आकाश जाधव यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. आकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आयुषीने या पूर्वी देखील २०२३ व २०२४ मध्ये जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय “खेलो इंडिया अस्मिता वुमन्स स्पर्धांमध्ये” सलग दोन वेळा सुवर्णपदक जिंकले होते.

उझबेकिस्तान देशाचा पारंपरिक खेळ “कुराश” यामध्ये पहिल्यांदाच भाग घेत, मर्यादित तयारी असूनही आयुषीने प्रभावी खेळ करत दुसरा क्रमांक मिळवला. प्रसंगी आकाश जाधव म्हणाले की “आयुषी ही अत्यंत जिद्दी आणि चिकाटीने खेळणारी खेळाडू आहे. तिला कुराशबाबत फारशी माहिती नव्हती सरावाचीही संधी देखील मिळाली नव्हती जर तयारीची संधी मिळाली असती तर ती निश्चितच सुवर्णपदक देखील जिंकली असती.” सदर स्पर्धेत उदयन घोरपडे – सुवर्णपदक, राजवीर देशमुख – सुवर्णपदक, आयुषी केंद्रे – रौप्यपदक तर स्वरा गायकवाड – रौप्यपदकाचे मानकरी ठरले आहेत.सदरच्या यशाबद्दल कुराश असोसिएशन महाराष्ट्रचे अध्यक्ष अंकुश नागर व महासचिव शिवाजी साळुंखे यांनी सर्व खेळाडूंना आणि प्रशिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे