नेरळ मधील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ केंद्रात शाकंभरी पौर्णिमा उत्साहात साजरी…..
नेरळ : सुमित क्षिरसागर

कर्जत ता ५ जाने – कल्याण राज्य महामार्गावरील नेरळ मधील गणेशनगर पायरमाळ येथील दिंडोरी प्रणित अखिल भारतीय स्वामी समर्थ सेवा केंद्रात शाकंभरी पौर्णिमा मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. या शाकंभरी पौर्णिमेच्या निमित्ताने स्वामी सर्मथ यांचे दर्शनासाठी भक्तांची अलोट गर्दी झाली होती.

शाकंभरी पौर्णिमा हा दिवस शाकंभरी जयंती म्हणूनही ओळखला जातो. पौष पौर्णिमा म्हणजे पौष महिन्याच्या अष्टमी तिथीपासून सुरू होणाऱ्या शाकंभरी नवरात्रीचा हा शेवटचा दिवस असतो. शक्तीची साधना करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ आणि फलदायी मानला जातो. कारण याच दिवशी पृथ्वीला दुष्काळ आणि अन्नसंकटातून मुक्त करण्यासाठी माता शाकंभरी प्रकट झाल्याचे मानले व बोलले जाते.
शाकंभरी नवरात्री ही दि.२८ डिसेंबर ते ०३ जानेवारी २०२६ या कालावधीत नेरळ मधील गणेशनगर पायरमाळ येथील दिंडोरी प्रणित अखिल भारतीय स्वामी समर्थ सेवा केंद्रात शाकंभरी पौर्णिमा मोठया उत्साहात साजरी करण्यात आली आहे. यावेळी श्री स्वामी सर्मथ मठात श्री स्वामी दर्शना साठी भक्तांगणांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती. तसेच संध्याकाळ ६.३० ला होणाऱ्या नैवेद्य आरतीला भक्तांकडून श्री स्वामी समर्थांना ६४ भाज्यांचा नैवेद्य दाखवण्यात आला. व आरती नंतर तो दाखविण्यात आलेला नैवेद्य हा प्रसाद म्हणून सर्व भक्तगणांस सेवेकरी वर्गाला वाटण्यात आला. या उत्सवासाठी श्री स्वामी समर्थ मठामध्ये भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून सेवेकरी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.



