महाराष्ट्र

दिव्यात राष्ट्रीय एकता व जवानांच्या सन्मानार्थ ” तिरंगा पदयात्रा “

[wps_visitor_counter]

 

संतोष पडवळ – प्रतिनिधी

ठाणे, दिवा ता २३ मे : दिवा शहरात राष्ट्रीय एकता व जवानांच्या सन्मानार्थ भाजपच्या वतीने तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. शुक्रवार दिनांक 23 मे 2025 रोजी सायंकाळी ६ वाजता दिव्यातील प्रशांत नगर येथील भाजपचे ठाणे जिल्हा कार्यकारणी सदस्य गणेश भगत यांच्या जनसंपर्क कार्यालयापासून सदर तिरंगा पद यात्रेला सुरुवात करण्यात आली. राष्ट्रीय एकतेचे दर्शन घडविण्यासाठी व सीमेवरील सैनिकांचे मनोबल वाढविण्यासाठी सदर तिरंगा पदयात्रेचे दिवा भाजपच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. सदर तिरंगा यात्रा मुंब्रादेवी कॉलनी, विठ्ठल रुख्मिणी नगर मार्गे दिवा पोलीस चौकी या मार्गांवर काढण्यात आली.

सदर तिरंगा पदयात्रेत दिवा भाजपसह अनेक दिवेकर नागरिकांनी आपला सहभाग नोंदवला. प्रसंगी भाजपचे मंडळ अध्यक्ष सचिन भोईर, अशोक पाटील, दिलीप भोईर, रॊशन भगत, मधुकर पाटील, दुर्गेश मढवी, समीर चव्हाण, सतीश केळशीकर, अंकुश मढवी, विजय भोईर, कल्पेश सारस्वत, यज्ञेश पवार, प्रवीण पाटील, जिलाजीत तिवारी, अजय सिंग, समशेर यादव, क्रांती सिंग, अनिल सिंग, विक्रमप्रताप सिंग, महिला मोर्चा अध्यक्षा सपना भगत, सीमा भगत, सुनीता प्रजापती, पूनम सिंग आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सदर तिरंगा पदयात्रेची सांगता दिवा पोलिस चौकी येथे करण्यात आली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे