ब्रेकिंग
ब्रेकिंग ; दिवा खर्डी येथील ओम बंगल्यात गॅस सिलेंडरला लागलेल्या आगीत घरसामान जळून खाक.
[wps_visitor_counter]
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे, दिवा ता ४ फेब्रु : आज दिनांक ०४/०२/२०२६ रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास आशापुरा मेडिकल मागे, खर्डी गाव, दिवा (पू.) ठाणे या ठिकाणी ओम बंगला (मालक – श्री.गणेश भोईर) मध्ये भारत गॅस सिलेंडरला आग लागली होती. सदर घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान ०१- फायर वाहन व १-रेस्क्यू वाहनासह तसेच टोरंट पॉवर कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते. सदर घटनास्थळी कोणालाही दुखापत नाही. सदर घटनास्थळी आग लागल्याने किचनमधील साहित्य, फ्रिज, इलेक्ट्रिक वायरिंग, गॅस सिलेंडर इत्यादी जळून नुकसान झाले आहे.
सदर घटनास्थळी किचनमध्ये लागलेली आग अग्निशमन दलाच्या जवानांकडून १५:३० वाजताच्या सुमारास पूर्णपणे विझविण्यात आली असून, परिस्थिती नियंत्रणात आहे.
[wps_visitor_counter]



