ब्रेकिंग

श्री गणेशापाठी गौरी आगमनाने कर्जत तालुक्यात उत्साह – आज पूजन व स्थापना

[wps_visitor_counter]

 

कर्जत: सुमित क्षिरसागर

ता १ सप्टेंबर : भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला घरोघरी विराजमान झालेल्या गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असून, त्यात आता गौरी आगमनामुळे भक्तिभावाचे नवीन पर्व सुरू झाले आहे. कर्जत तालुक्यातील घराघरांत काल “गौरी घरी आली” आणि आज मोठ्या श्रद्धा व भक्तिभावाने तिची स्थापना करण्यात आली आहे.

 

पारंपरिक श्रद्धेनुसार गौरी म्हणजे समृद्धी, सौभाग्य आणि पीकबहराचे प्रतीक. स्त्रियांसाठी गौरी आगमन हा एक खास सोहळा असतो. काल महिलांनी सनई-चौघड्याच्या नादात, मंगलगाणी म्हणत गौरीचे स्वागत केले. आज सकाळपासून घराघरांत फुलांची तोरणे, गजरे, सुंदर रांगोळ्या व विविधरंगी साड्यांनी सजावट करून गौरींची स्थापना करण्यात आली.

 

गौरी पूजनावेळी तांदूळ, नारळ, सुपारी, हळदीकुंकू यांसारख्या वस्तूंचा समावेश असला तरी महिलांकडून विशेष व्रत केले जाते, तर संध्याकाळी ओवाळणी, मंगलाष्टके व भजने यांनी वातावरण अधिकच मंगलमय होते. ग्रामीण भागात तर गौरीचे आगमन म्हणजे शेतकऱ्यांसाठी पिकाच्या भरघोस उत्पन्नाची व वर्षभराच्या समृद्धीची आशा मानली जाते.हा सोहळा साजरा होत असताना महिला देखील पारंपरिक वेशभूषेत येऊन उत्सव मोठ्याने साजरा करताना दिसतात.

दरम्यान, यंदाचा गणपती उत्सव पाच दिवसांऐवजी सात दिवस साजरा होत असल्याने आनंदोत्सवाचा काळ दोन दिवसांनी अधिक वाढला आहे. अलीकडच्या काळात अनेक कुटुंबांमध्ये गौरी-गणपतीचे एकत्र विसर्जन करण्याची प्रथा दिसून येत आहे. त्यामुळे गणराय व गौरींचा सोहळा भक्तिमय आणि कौटुंबिक एकात्मतेचे प्रतीक ठरत असल्याचे चित्र कर्जत तालुक्यात पाहायला मिळत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे