ब्रेकिंग ; ठाण्यात समाजसेवक महेश मोरे विरोधात नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये मारहाण व शिवीगाळ व गुंडगिरी प्रकरणी तक्रार दाखल

ठाणे ता २१ मे : अर्जदार प्रतीक विश्वनाथ भंडारे यांनी दिनांक 21 मे 2026 रोजी सायंकाळी अंदाजे 5 वाजताच्या सुमारास विष्णुनगर परिसर, नौपाडा पोलीस स्टेशन हद्दीत यांनी माझ्यासोबत अत्यंत गंभीर व निषेधार्ह प्रकार घडला असल्याचे उघड झाले आहे.
महेश प्रभाकर मोरे हे स्वतःला समाजसेवक म्हणून सोशल मीडियावर “स्वच्छ कारभार, तत्पर सेवा, जय जवान जय किसान” अशा नावाने प्रसिद्ध करतात. परंतु प्रत्यक्षात त्यांनी प्रतीक सोबत गलिच्छ भाषेत शिवीगाळ करून मारहाण केली असून दमदाटी व गुंडगिरी केली आहे. सदर घटनेचे व्हिडिओ पुरावे व संबंधित कागदपत्रे माझ्याकडे उपलब्ध आहेत. या घटनेमुळे मला मानसिक त्रास, भीती व अपमान सहन करावा लागला आहे. समाजात स्वतःला सज्जन व समाजसेवक म्हणून दाखवणाऱ्या व्यक्तीकडून अशा प्रकारची वर्तणूक होणे अत्यंत दुर्दैवी आहे. आज माझ्यासोबत जे घडले ते उद्या इतर कोणासोबतही घडू शकते. त्यामुळे अशा गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी प्रतीकने केली आहे. प्रकरणी नौपाडा पोलीस स्टेशन येथे अ-दाखल पत्र गुन्हा रजिस्टर नंबर 635/2026 अंतर्गत नोंद करण्यात आली आहे.



