ब्रेकिंग : दिव्यातील साबेगावात बॅटरीचा स्फोट ; घरातील फर्निचर जळून खाक.
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे, दिवा : आज दिनांक ०२/०२/२०२६ रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास दिवा हायस्कूल जवळ, साबेगाव रोड, दिवा, ठाणे या ठिकाणी सिद्धांत रिजेन्सी बिल्डिंग नंबर १ या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील रूम क्रमांक:-३०२ (मालक:- अज्ञात) या रूममध्ये इलेक्ट्रिक चार्जिंग बॅटरीचा स्फोट होऊन आग लागली होती. सदर घटनास्थळी शीळ अग्निशमन केंद्राचे स्थानक अधिकारी श्री. इंगळे सो., टोरंट कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान ०१-फायर वाहन व १ रेस्क्यू वाहनासह उपस्थित होते. सदर घटनास्थळी कोणालाही दुखापत नाही.
सदर घटनास्थळी घरामध्ये इलेक्ट्रिक दुचाकी वाहनाची चार्जिंगला लावलेली बॅटरी ब्लास्ट होऊन आग लागली होती. सदरची आग लागल्यामुळे घरातील सोफा, फर्निचर व इलेक्ट्रिक वायरिंग पूर्णपणे जळून नुकसान झाले आहे. सदर घटनास्थळी घरामध्ये लागलेली आग अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने ४ :४० वाजताच्या सुमारास पूर्णपणे विझविण्यात आली असून, परिस्थिती नियंत्रणात आहे.



