ब्रेकिंग

पळसदरीतील स्वामी समर्थ मठात भक्तीचा महासागर….नवीन वर्ष, गुरुवार व एकादशीचा दुर्मिळ सन दुग्धशर्करा योग.

[wps_visitor_counter]

 

कर्जत: सुमित क्षिरसागर

कर्जत ता २ जाने : इंग्रजी नवीन वर्षाची मंगल सुरुवात, गुरुवार आणि एकादशी असा दुर्मिळ सन दुग्धशर्करा योग एकाच दिवशी आल्याने कर्जतजवळील श्रीक्षेत्र पळसदरी, पुण्यनगरी येथील अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मठात भाविकांचा अक्षरशः जनसागर उसळला. या पवित्र योगाचे महत्त्व लक्षात घेता स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविक पहाटेपासूनच मठ परिसरात दाखल झाले होते.
या विशेष दिनानिमित्त श्री स्वामी समर्थ मठ व मुख्य मंदिरात भव्य आरस सजावट करण्यात आली होती. आरशांच्या झगमगाटात आणि फुलांच्या आकर्षक सजावटीत जागरूक, तेजस्वी रूपातील श्री स्वामी समर्थांचे दर्शन भाविकांना घडत होते. सजवलेले गर्भगृह, दिव्यांची रोषणाई आणि सुगंधी पुष्पहारांनी संपूर्ण मंदिर परिसर अधिकच भक्तिमय झाला होता.


आजच्या दिवसाचे धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व लक्षात घेता मठात सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भजन, कीर्तन, नामस्मरण, काकड आरती व महाआरतीमुळे परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. भाविकांसाठी तीर्थप्रसाद व महाप्रसादाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.
मुंबई, पुणे, ठाणे तसेच कर्जत तालुक्यातील विविध भागांतून हजारो भाविक स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी पळसदरी येथे दाखल झाले होते. यामुळे खोपोली–पळसदरी–कर्जत महामार्गावर दिवसभर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मठापासून सुमारे दोन किलोमीटरपर्यंत दर्शनासाठी भाविकांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या.
भर उन्हातही लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील भाविक तासनतास शांतपणे रांगेत उभे राहून स्वामींच्या दर्शनाची वाट पाहत होते. “नवीन वर्षाची सुरुवात, गुरुवार व एकादशीच्या पवित्र योगात स्वामी समर्थांचे जागरूक दर्शन घडावे” या अढळ श्रद्धेने भाविक मोठ्या भक्तिभावाने येथे उपस्थित होते.
या दुर्मिळ सन दुग्धशर्करा योगाच्या दिवशी स्वामी समर्थ भक्तांची अढळ श्रद्धा, निष्ठा व भक्तीचे दर्शन घडले. संपूर्ण पळसदरी परिसर ‘श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ’ या जयघोषाने दुमदुमून गेला होता.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे