आरोग्य व शिक्षणब्रेकिंग

दिव्यात ठाणे महापालिका प्रशासनाने स्वतःच्या शाळा वाढवाव्यात – ज्योती पाटील.

[wps_visitor_counter]

 

संतोष पडवळ – प्रतिनिधी

ठाणे ता ३० जून : ठाणे महानगर पालिका हद्दीतील वाढत्या लोकसंख्येच्या दिवा शहरात अनधिकृत शाळा आणि अधिकृत शाळा यांच्या संघर्षात वि‌द्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. ठाणे महापालिका प्रशासनाने दिव्यात स्वतःच्या शाळा वाढविल्यास खासगी शाळांची मक्तेदारी मोडीत निघेल व अनधिकृत शाळा देखील बंद होतील असे स्पष्ट मत ठाकरे शिवसेनेच्या शहर संघटिका ज्योती पाटील यांनी मागणी केली आहे. दिवा शहराची लोकसंख्या वाढली तरी शैक्षणिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यास ठाणे महानगरपालिकेचा शिक्षण विभाग असमर्थ ठरला आहे. महापालिकेच्या शाळांची संख्या दिव्यात वाढली नसल्याने येथे दरवर्षी अनधिकृत शाळांची संख्या मात्र वाढत आहेत. यात वि‌द्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. महापालिका शाळांची संख्या वाढून जर दिवा शहरातील सर्वसामान्य कुटुंबातील वि‌द्यार्थ्यांना महापालिकेच्या शाळांमध्ये प्रवेश मिळाला तर कोणताही पालक आपल्या पाल्याला अनधिकृत शाळेमध्ये जादाची फी भरून प्रवेश घेणार नाही.

दिव्यातील खाजगी शाळांची फी ही सर्वसामान्य नागरिकांना परवडत नाही. परिणामी येथील अनेक पालक वर्ग आपल्या पाल्याला नाईलाजाने अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेतात. एकीकडे महापालिकेच्या शाळा उपलब्ध नाहीत, तर दुसरीकडे खाजगी शाळांची फी सर्वसामान्यांना परवडत नाही. यात पालक वर्ग भरडला जात आहे. दिव्यात असणाऱ्या खाजगी शैक्षणिक संस्था या सुद्धा हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या असून त्यांच्याही काही मर्यादा आहेत. तिथेही मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सामावून घेण्याची क्षमता नाही ही बाब लक्षात घेऊन आपण दिवा शहरात महापालिका शाळांची संख्या वाढविणे गरजेचे असून इयत्ता 10 वी पर्यंत या नवीन शाळा सुरु करणे अत्यावश्यक आहे. ज्या शाळांना परवानगी किंवा मान्यता देणे शक्य आहे अशा शाळांना तातडीने परवानगी द्यावी त्यासाठी प्रशासनाने विशेष पुढाकार देखील घ्यावा ही मागणी निवेदनाद्वारे शहर संघटिका ज्योती पाटील यांनी दिवा प्रभाग समितचे सहायक आयुक्त शिवप्रसाद नागरगोजे यांसकडे केली आहे.प्रसंगी विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे, शहर संघटिका ज्योती पाटील, विभाग प्रमुख योगेश निकम, नागेश पवार, रवी रसाळ, विभाग संघटिका सुहासिनी गुलेकर, संगीता उतेकर, संगीता मचाडो, तसेच भाग्यश्री जाधव आदी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे