आरोग्य व शिक्षणब्रेकिंग

मैत्री’चा शैक्षणिक मदतीचा हात; वाकस ग्रामपंचायतीतील पाच जिल्हा परिषद शाळांमध्ये वह्या, शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलले आनंदाचे हास्य; मैत्री ग्रुप नेरळचा स्तुत्य सामाजिक उपक्रम

[wps_visitor_counter]

 

नेरळ : सुमित क्षिरसागर

वाकस ग्रामपंचायतीच्या हद्दीतील वाकस, मिरचोली, चोरावळे, कोळीवली व नेवाली येथील रायगड जिल्हा परिषद शाळांमध्ये मैत्री ग्रुप नेरळ यांच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्या, विविध शैक्षणिक साहित्य तसेच खाऊचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या शिक्षणाच्या प्रवासात सामाजिक संस्थांनी हातभार लावावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक असणारे साहित्य उपलब्ध करून देत ‘मैत्री’ ग्रुपने सामाजिक बांधिलकी जपण्याचा आदर्श निर्माण केला आहे. शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य उमटले. या उपक्रमाचे शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती तसेच पालकांकडून कौतुक करण्यात आले.

या उपक्रमावेळी मैत्री ग्रुप नेरळचे अध्यक्ष श्री. प्रितम गोरी, कार्याध्यक्ष श्री. संदीप उतेकर, सोशल मीडिया प्रमुख श्री. दिपक  मोरे, खजिनदार श्री. शिवाजी जाधव, गट प्रमुख श्री. चेतन जैन, हिशोबनीस श्री. रणजित देशमुख, माजी खजिनदार श्री. चंद्रकांत राठोड, उपगट प्रमुख श्री. निरंजन दळवी, सदस्य श्री. गणेश भुंडेरे तसेच मैत्री ग्रुपचे इतर सदस्य उपस्थित होते.

तसेच वाकस जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक बिरमल तांबे सर, नितेश बडेकर सर, राहुल जोगदंडे सर, अश्विनी खांबाळे मॅडम, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. वासंती विश्वास दळवी आणि उपाध्यक्षा सौ. धनश्री कैलास दळवी यांचीही उपस्थिती होती.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना मन लावून अभ्यास करण्याचे आवाहन केले. शिक्षणाच्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्यासाठी भक्कम पाया निर्माण करावा, असा संदेश देण्यात आला.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा ओळखून त्यांना आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याचा मैत्री ग्रुपचा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरला असून, भविष्यातही अशाच प्रकारचे विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविण्याचा संकल्प मैत्री ग्रुपच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे