खासदार वाकचौरे यांच्याहस्ते गोपाल भानुशाली यांना भारत समाज भूषण पुरस्कार.
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे ता १७ ऑगस्ट : धर्मवीर छत्रपती संभाजी प्रतिष्ठान महाराष्ट्र च्यावतीने दिला जाणारा भारत समाज भूषण पुरस्कार यंदा ठाणे शहरातील सामाजिक कार्यकर्ते श्री गोपाल लालजी भानुशाली यांना जाहीर करण्यात आला होता. दरवर्षी धर्मवीर छत्रपती संभाजी राजे प्रतिष्ठान निवड समिती व प्रा. डॉ बी एन खरात संचालक समृद्धी पब्लिकेशन सिंधुदुर्ग यांनी दिली आहे प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा भारत समाज भूषण पुरस्काराने सन्मानित केले जाते यावर्षी समाज प्रबोधन, सामाजिक शैक्षणिक दुर्ग सर्वधन ग्रंथालय अशा विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांना सदर पुरस्काराने सन्मान करण्यात येतो.
शिर्डी येथे पार पडलेल्या शानदार सोहळ्यात ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते गोपाल लालजी भानुशाली यांना 2025 भारत समाज भुषण पुरस्कार शिर्डी लोकसभेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रसंगी प्राध्यापक डॉ बी एन खरात संचालक समृद्धी पब्लिकेशन सिंधुदुर्ग, श्री विजय पटवर्धन प्रसिद्ध अभिनेते, रविंद्र गुंजाळ संस्थापक अध्यक्ष धर्मवीर छत्रपती संभाजी राजे प्रतिष्ठान महाराष्ट्र व आदी मान्यवर उपस्थित होते.




