ब्रेकिंग

रोटरी क्लब ऑफ दिवा, ठाणेच्या अध्यक्षपदी किशोर पाटील तर सचिवपदी स्वप्निल गायकर यांची निवड.

[wps_visitor_counter]

 

संतोष पडवळ – प्रतिनिधी

ठाणे, दिवा ता ९ जून : रोटरी क्लब ऑफ दिवा ठाणे च्या सन २०२५-२६ वर्षासाठी अध्यक्षपदी किशोर सदाशिव पाटील तर सचिवपदी स्वप्निल मारुती गायकर यांची निवड करण्यात आली आहे. दिवा शहरात रोटरी क्लब ऑफ दिवाची स्थापना २०१७ मधे झाली तेव्हापासून रोटरी क्लबचे ९ वे अध्यक्ष म्हणून किशोर पाटील यांची नियुक्ती रोटरी जिल्हा ३१४२ चे प्रांतपाल हर्ष माकोल यांच्या हस्ते करण्यात आली आहे.

रोटरी क्लब ऑफ दिवाच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य केली जातात. गतवर्षी अध्यक्ष आदित्य पाटील यांच्या काळात रक्तदान शिबिर, ठाणे जिल्ह्यातील भाल गावातील जिल्हा पंचायत शाळेत सभागृह बांधणे, बुरसुंगे गावातील जि. प. शाळेला नूतनीकरण करणे, घे भरारी च्या माध्यमातून १० वी व १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार व त्यांना मार्गदर्शन, आदिवासी पाड्या मध्ये मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप, आंतरशालेय चित्रकला स्पर्धा घेतली, महिलांना स्वयंरोजगार प्राप्त व्हावा या उद्देशाने शिलाई मशिनचे वाटप आदी सामाजिक कामे करण्यात आली आहेत. तसेच या वर्षी देखील जनसेवेची अनेक सामाजिक कार्य करून व योगदान देऊन क्लबच्या माध्यमातून सक्रिय असू असे नवनियुक्त अध्यक्ष किशोर पाटील यांनी बोलताना स्पष्ट केले. प्रसंगी रोटरी क्लब ऑफ दिवा ठाणे चे सर्व इतर पदाधिकारी व सभासद उपस्थित होते. प्रसंगी नवनिर्वाचित अध्यक्ष किशोर सदाशिव पाटील यांचे सर्वांनी अभिनंदन व कौतुक केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे