नेरळ व्यापारी वेल्फेअर असोसिएशनची नवी कार्यकारिणी जाहीर विशाल साळुंके अध्यक्षपदी बिनविरोध निवड
नेरळ: सुमित क्षिरसागर

नेरळ ता १७ जाने : नेरळ शहरातील व्यापाऱ्यांच्या प्रश्नांना नेहमीच आक्रमकपणे वाचा फोडणारे, तसेच सर्वसामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये सहज मिसळून राहणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेले नेरळ व्यापारी फेडरेशनचे सदस्य विशाल साळुंके यांची आता व्यापारी वेल्फेअर असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मागील अध्यक्ष मनोहर अहिरे यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने ही निवड प्रक्रिया पार पडली.
नवीन कार्यकारिणीचा कार्यकाळ दोन वर्षांचा असणार असून, व्यापाऱ्यांच्या विविध समस्या, प्रश्न, अडचणी याबाबत अधिक प्रभावीपणे लढा देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.नवीन कार्यकारिणीत,उपाध्यक्ष म्हणून प्रीतम गोरी व पंढरी हजारे,सेक्रेटरी म्हणून कमलेश ठक्कर व मेहुल कटारिया,खजिनदार म्हणून अमित जैन व दिनेश जैन यांची निवड करण्यात आली आहे.
तसेच सल्लागार मंडळात सलीम तांबोळी, सुधाकर देसाई, निलेश शहा, मनोहर अहिरे व महेश कटारिया यांचा समावेश करण्यात आला आहे. विशाल साळुंके हे व्यापाऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने प्रशासनासमोर ठाम भूमिका मांडताना दिसले असून, कर, परवाने, पायाभूत सुविधा, बाजारपेठेतील अडचणी याबाबत त्यांनी वेळोवेळी आवाज उठवला आहे. त्यांची ही आक्रमक पण समन्वयाची भूमिका लक्षात घेता व्यापारी वर्गात समाधान व्यक्त होत आहे.नवीन कार्यकारिणीमुळे नेरळ शहरातील व्यापाऱ्यांच्या समस्या अधिक प्रभावीपणे मार्गी लागतील, अशी अपेक्षा यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विशाल साळुंके यांनी व्यक्त केली आहे .



