संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे ता ३ सप्टें : दिवा शहरातील मानपाडा रोड वरील आगासन येथील नेहमीची वाहतूक कोंडी तसेच रेल्वे फाटकासंबधीची समस्या हि अत्यंत गंभीर असून याचा स्थानिक नागरिकांच्या दैनदिन जीवनावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असून या रेल्वे फाटकामुळे दिवा वासियांना तसेच जवळपास असणाऱ्या गावाना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. तासंतास वाहतूक कोडी, रुग्णवाहिका, शालेय बस, आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी, आग्निशामक वाहन वेळेवर पोहचू शकत नाही. तसेच या रेल्वे फाटकामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असून कोणतीही जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही विशेषत; दुचाकी व पादचाऱ्यासाठी हा मार्ग धोकादायक असून येथे रेल्वेच्या माल वाहतूक गाड्या व इतर एक्सप्रेस गाड्या दररोजच्या 10 ते 15 मिनिटाला असून नागरिकांना वेळेअभावी किंवा अन्य कामानिमित्त जावे लागते परिणामी मोठा मनस्ताप सहन करावा लागतो.
सदर आगासन रेल्वे फाटकामूळे सततची वाहतूक कोंडी होते यासाठी सदर ठिकाणी उड्डाणपूल व्हावा अशी अनेकांची मागणी असून तात्काळ रेल्वे उड्डाणपूल बांधण्यासाठी रेल्वे प्रशासनाने निर्णय घ्यावा यासाठी ठाकरे शिवसनेचे दिवा उपशहर प्रमुख मारुती पडळकर यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांची भेट घेऊन यांसंदर्भात निर्णय घ्यावा अशी विनंती केली आहे. सदर ठिकाणी उड्डाणपुलासाठी गांर्भीयाने विचार करूण तातडीने रेल्वे प्रशासनाने निर्णय घ्यावा व होण्याऱ्या वाहतूक कोंडीतून सुटका करावी यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे दिवा उपशहर प्रमुख मारूती आबा पडळकर आग्रही असल्याचे स्पष्ट केले आहे.




