ब्रेकिंगराजकिय

नेरळच्या राजकारणात खळबळ! संदीप उतेकर यांच्या उमेदवारीवरून शिवसेनेत अंतर्गत धुसफूस? “नेरळच्या राजकारणात ट्विस्ट! संदीप उतेकर यांना उमेदवारी मिळणार की पक्षांतराचा धक्का?”

[wps_visitor_counter]

नेरळ: सुमित क्षिरसागर

दि.१६ जून २०२६:
वॉर्ड क्रमांक ३ च्या आरक्षणानंतर राजकीय समीकरणांना वेग; उमेदवारी न मिळाल्यास मोठ्या निर्णयाची चर्चा

कर्जत तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींच्या सदस्यपदासाठी आरक्षण सोडत जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. इच्छुक उमेदवारांनी आपल्या-आपल्या वॉर्डात मोर्चेबांधणी सुरू केली असून नेरळ ग्रामपंचायतीतील वॉर्ड क्रमांक ३ सध्या राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे.

नेरळच्या वॉर्ड क्रमांक ५ मध्ये ओबीसी महिला, एससी महिला आणि एसटी महिला असे आरक्षण पडल्याने अनेक इच्छुकांच्या आशांवर पाणी फिरले आहे. मात्र वॉर्ड क्रमांक ३ मध्ये ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण पुरुष असे आरक्षण जाहीर झाल्याने येथील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

याच पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेरळ उपशहर प्रमुख संदीप उतेकर यांनी वॉर्ड क्रमांक ३ मधून निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा आहे. स्थानिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे आणि जनसामान्यांशी थेट संपर्क ठेवणारे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. पाणीटंचाई, वीज समस्या, रस्ते, गटारे तसेच कचरा व्यवस्थापन यांसारख्या अनेक प्रश्नांवर त्यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा करून कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे.

यामुळेच वॉर्ड क्रमांक ३ मधून पक्षाने संदीप उतेकर यांनाच उमेदवारी द्यावी, अशी मागणी त्यांच्या समर्थकांकडून जोर धरू लागली आहे. मात्र दुसरीकडे उमेदवारीवरून पक्षांतर्गत मतभेद असल्याच्या चर्चांनाही उधाण आले आहे.

राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेनुसार, जर पक्षाने उतेकर यांना उमेदवारी नाकारली तर ते मोठा राजकीय निर्णय घेऊ शकतात. काही सूत्रांच्या मते, अशा परिस्थितीत ते शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश करण्याचा पर्यायही खुला ठेवू शकतात. त्यामुळे नेरळमधील आगामी निवडणुकीत नवे राजकीय समीकरण तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सध्या तरी या चर्चांवर अधिकृत शिक्कामोर्तब झालेले नसले तरी नेरळमधील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत आहे. आता पक्षश्रेष्ठी संदीप उतेकर यांच्या उमेदवारीबाबत काय निर्णय घेतात आणि आगामी निवडणुकीत कोणते नवे राजकीय चित्र उभे राहते, याकडे नेरळकरांचे लक्ष लागून राहिले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे