ब्रेकिंग

दिवा स्टेशन पूर्वेकडील रस्ता तात्काळ फेरीवाला व वाहतूक कोंडीमुक्त करा – अँड.आदेश भगत.मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १५० मीटर परिसरातील फेरीवाले आणि बेशिस्त रिक्षाचालक यांच्यावर कठोर कारवाई करावी.

[wps_visitor_counter]

 

संतोष पडवळ – प्रतिनिधी

ठाणे ता १६ जून : दिवा स्टेशन पूर्व परिसरात होणारी वाहतूक कोंडी सर्वश्रुत असून स्टेशन परिसरात रस्त्याच्या दुतर्फा बसलेल्या फेरीवाल्यांमुळे व बेशिस्त रिक्षाचालकांमुळे नागरिकांना येथून मार्ग काढणे कठीण झाले आहे. दिवा शहरात स्थायिक झालेला बहुतांशी नागरिक हा मध्यमवर्गीय असल्याने ९० टक्के पेक्षा जास्त नागरिक हा रेल्वे ने प्रवास करतो, परिणामी दिवा स्टेशन परिसर नेहमी गजबजलेला असतो. रेल्वे स्थानकात होणारी गर्दी व रेल्वे परिसरात रिक्षा, बस व छोटे मोठे व्यापार करणारे व्यापारी यामुळे या ठिकाणी नेहमीच अप्रिय घटना घडत असते आणि त्यामुळे मा. उच्च न्यायालयाने या संदर्भात कठोर आदेश देऊन मध्य रेल्वे मार्गावरील सर्वच रेल्वे स्थानकांपासून १५० मीटर परिसर हा फेरीवाला मुक्त, वाहतूक कोंडीमुक्त ठेवावा असे स्थानिक प्राधिकरणाला निर्देश दिले आहेत. मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आपण दिवा स्टेशन परिसर फेरीवाला व वाहतूक कोंडीमुक्त ठेवण्यासाठी १५० मीटर परिसरातील फेरीवाले आणि बेशिस्त रिक्षाचालक यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी दिवा शिवसेना उपशहरप्रमुख अँड आदेश भगत यांनी सहायक आयुक्त शिवप्रसाद नागरगोजे यांस केली आहे.

दिवा स्टेशन पूर्व परिसरात उड्डाण पुलासाठी उभे करण्यात आलेल्या शीळ दिशेकडील शेवटच्या पिलर जवळ रस्ता पूर्णतःहा अरुंद झाला असून सदर पिलर पासून दिवा चौकापर्यंत धंदा करणाऱ्या फेरीवाल्यांना मागे जाण्याचे निर्देश देऊन तिथे रस्ता मोकळा करावा जेणेकरून त्याभागात वाहतूक कोंडी होणार नाही व पाद चाऱ्यांना, शालेय विद्यार्थ्यांना तसेच वाहन चालकांना येण्याजण्यास कोणताही अडथळा होणार नाही अशी देखील मागणी दिवा शिवसेना उपशहरप्रमुख अँड आदेश भगत यांनी सहायक आयुक्त शिवप्रसाद नागरगोजे यांस केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे