आरोग्य व शिक्षणब्रेकिंग

ठाणे महानगरपालिकेतील शिवसेना गटनेता कार्यालयाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन.

0 5 1 8 8 9

 

संतोष पडवळ – प्रतिनिधी

ठाणे ता १८ मे : ठाणे महानगरपालिकेतील शिवसेना पक्षाच्या गटनेता कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते आज मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या कार्यालयातून नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचे काम होईल असा विश्वास याप्रसंगी शिंदे यांनी बोलताना व्यक्त केला. ठाण्याने शिवसेनेला कायम साथ दिली असून, ठाण्याच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध आहे. शहरात आज मेट्रोसह विविध विकासकामे वेगाने सुरू असल्याचे याप्रसंगी नमूद केले. या कार्यालयांच्या माध्यमांतून पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी जनतेसाठी कार्यरत राहावे असे आवाहन यावेळी शिंदे यांनी केले.

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ठाण्यावर विशेष प्रेम होते आणि ठाण्याने शिवसेनेला मोठे करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या माध्यमातून ठाणेकरांसाठी काम करताना, नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांना जुन्या नगरसेवकांनी मार्गदर्शन करावे असा सल्लाही याप्रसंगी शिंदे यांनी दिला. यावेळी खासदार नरेश म्हस्के, खासदार प्रा.ज्योती वाघमारे, महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, शिवसेना सचिव राम रेपाळे, नगरसेवक विकास रेपाळे, ज्येष्ठ नगरसेवक मनोज शिंदे, शिवसेना ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख मिनाक्षी शिंदे, माजी उपमहापौर सौ.पल्लवी कदम व रमाकांत मढवी, नगरसेविका सौ.नम्रता भोसले-जाधव, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे यांच्यासह शिवसेनेचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

शिवनेरी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 8 8 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे