ब्रेकिंगराजकिय

ठाण्यात ९ नोव्हेंबरला भारत मुक्ती मोर्चा आयोजित विशाल जन आक्रोश रॅली.

0 5 1 8 8 9

 

संतोष पडवळ – प्रतिनिधी

ठाणे ता ६ नोव्हें : ठाण्यात ९ नोव्हेंबरला विशाल जन आक्रोश रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. भारत मुक्ति मोर्चा, राष्ट्रीय पिछडा वर्ग (OBC) मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा आणि बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यमाने आज ठाणे शहरातील वर्तक नगर येथे पत्रकार परिषद पार पडली. सदर पत्रकार परिषदेत “विशाल जन आक्रोश रॅली” संदर्भात घोषणा करण्यात आली. सदर रॅली ९ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १ वाजता वर्तक नगर, ठाणे येथून सुरु होऊन खारटन मार्गे कोर्ट नाका येथे समारोप होणार आहे.

भारतातील सर्व निवडणुका या EVM मशीनऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात, इतर मागास प्रवर्ग (OBC) व इतर सर्व जातींची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, बोधगया येथील महाविहार हे बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्यात यावे, आदिवासी समाजावर होणाऱ्या अन्यायाला पायबंद घालण्यात यावा, महिलांच्या सुरक्षेसाठी व सन्मानासाठी विशेष कायदे कठोरपणे लागू करण्यात यावेत, खाजगीकरण व शिक्षणातील व्यावसायिक लुटीविरोधात कायदेशीर उपाययोजना करण्यात याव्यात, शेतकऱ्यांना MSP (किमान आधारभूत किंमत) कायद्याने हमीभाव देण्यात यावा, पेन्शन योजना व जुन्या पेन्शनचे पुनर्संचयन करण्यात यावे, मुस्लिम समाजाच्या संवैधानिक अधिकारांचे संरक्षण व मॉब लिंचिंगविरोधी कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी तसेच SC, ST, OBC कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण तात्काळ लागू करण्यात यावे या मागण्या असून सर्व वंचित, बहुजन, ओबीसी, अनुसूचित जाती-जमाती, आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजाचे संविधानिक, सामाजिक व राजकीय हक्क अबाधित ठेवण्यासाठी लढणाऱ्या सर्व संघटनांचा संयुक्त आवाज असणार आहे.सदर रॅलीतून बहुजन समाजाने एकत्र येऊन संविधान, सामाजिक न्याय आणि हक्कांसाठी लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त केला जाणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले असून अधिक माहितीसाठी 83696 16049 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

शिवनेरी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 8 8 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे