नेरळ मध्ये शौर्य दिन आणि श्रीमद्भगवत् गीता जयंतीचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबीर संपन्न
नेरळ : सुमित क्षिरसागर

कर्जत तालुक्यातील नेरळ येथील धारप सभागृह येथे विश्व हिंदू परिषद – बजरंग दल, मातृशक्ती, दुर्गावाहिनी आणि समर्थ सेवा मंडळ, नेरळ यांच्या संयुक्त विद्यमानातून आज दि. ७ डिसेंबर २०२५ रोजी श्रीराम जन्मभूमी येथे दि. ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी ढाचा पाडताना प्राणपणाने लढलेल्या कारसेवकांच्या शौर्याचे स्मरण करत, शौर्य दिन आणि श्रीमद्भगवत् गीता जयंतीचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

या रक्तदान शिबीराला विश्वहिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री साईनाथ श्रीखंडे , बजरंग दल जिल्हा सह मंत्री संग्राम सलगर, रायगड विभाग सह मंत्री प्रसन्न खेडकर, ॲड.अमोल सूर्यवंशी, अँड. दिपक गायकवाड, मनिष भगत, भावेश भगत, कुणाल कालेकर , संकेत कराळे, अक्षय माळी, प्रवीण बाबरे , अमोल भडसावळे,आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. या रक्तदान शिबीरामध्ये माया ब्लड सेंटर बदलापूर यांच्या माध्यमातून रक्त संकलित करण्यात आले. तर या रक्तदान शिबारात रक्तदात्यासाठी रक्तदान करण्याची वेळ ही सकाळी ९.०० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत नियोजित करण्यात आली होती. शिबिराला शहरातील युवक व महिला वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या रक्तदान शिबीरामध्ये एकूण ५० पेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.



