सौ. सुषमा वाकचौरे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारराने सन्मानित.
संतोष पडवळ – प्रतिनिधी
शिर्डी, २९ जून २०२५ – बी द चेंज फाउंडेशन यांच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार समारंभ साई पालखी निवास, शिर्डी येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या पुरस्कारासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे १३०० शिक्षकांनी अर्ज केला होता. सदर मान्यवर यादीत सुषमा अनंत वाकचौरे यांची निवड झाली असून, त्यांनी गेल्या २० वर्षांहून अधिक काळ खेळ व क्रीडा शिक्षण क्षेत्रात आपली निस्वार्थ सेवा दिली आहे. पद्मश्री पोपटराव पवार (कार्याध्यक्ष, ग्रामीण गाव योजना, महाराष्ट्र शासन) यांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
नवी मुंबईतील एनएमएमसी शाळा क्र. ९३ (CBSE), नेरुळ मध्ये काम करत असून हा पुरस्कार सुषमा अनंत वकचौरे यांच्यासाठी एक अत्यंत गौरवाची बाब आहे आणि त्यांच्या विद्यार्थ्यांप्रती व क्रीडा क्षेत्रातील योगदानाला मिळालेली ही मान्यता अत्यंत प्रेरणादायी आहे. सर्व स्थरातून त्यांच अभिनंदन व कौतुक केले जात आहे




