ब्रेकिंगराजकिय

दिव्यात राष्ट्रव्यापी भारत बंद संदर्भात पत्रकार परिषद संपन्न.

[wps_visitor_counter]

 

संतोष पडवळ – प्रतिनिधी

ठाणे ता २९ जून : आज दिवा शहरात भारत मुक्ती मोर्चा, बहुजन मुक्ती पार्टी व राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती 1 जुलै 2025 रोजी होणाऱ्या राष्ट्रव्यापी भारत बंद संदर्भात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. या परिषदेत बहुजन क्रांती मोर्चा चे संयोजक मा. महेश गडांकुश यांनी बंदच्या राष्ट्रीय मागण्या आणि कारणे स्पष्ट करताना सांगितले की, देशात लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या घटनांच्या विरोधात हे आंदोलन होत आहे.

ईव्हीएमचा विरोध व पारदर्शक निवडणूक प्रक्रिया म्हणून बॅलेट पेपरला समर्थन, ओबीसी जातींची जनगणना न करणे, आरएसएस-भाजपकडून बहुजन महापुरुषांचा अपमान, बोधगया मंदिर कायदा 1949 नुसार बौद्ध समाजाच्या धार्मिक स्वायत्ततेवर आघात तसेच असंवैधानिक वक्फ दुरुस्ती विधेयक 2025 नुसार जमिनीवर अघोषित कब्जा यासाठी भारत बंद घोषणा करण्यात आली

दिवा तसेच ठाणे शहरा संबंधीचे स्थानिक प्रश्न उपस्थित करत दिवा परिसरात अनेक गंभीर समस्या प्रलंबित असून शिक्षणाचे बाजारीकरण बंद करावे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून सरकारने दिव्यातील अनधिकृत शाळेतील विद्यार्थ्यांना अधिकृत शाळेमध्ये प्रवेश मिळवून द्यावा. कळवा येथील नाका कामगार महिलेवर बलात्कार व हत्या न्याय मिळावा, मुंब्रा रेल्वे अपघातातील मृतांना योग्य न्याय आणि दिवा-सी. एस. टी.एम. लोकल सुरु करणे, दिवा शहरातील तीव्र पाणीटंचाई व सरकारी रुग्णालयाची तातडीची गरज, दिवा स्टेशन पूर्व-पश्चिम बउड्डाणपुल व वाहतूक कोंडीचा प्रश्न, येऊर जंगलातील गोठा चालकावर अन्याय कोर्टाच्या स्टे आदेशाची पायमल्ली, दिव्यातील क्लस्टर योजनेबाबत गोंधळ स्पष्टता आणि अंमलबजावणीची मागणी बहुजन मुक्ती पार्टीचे महासचिव मा. चंद्रकांत सोनवणे यांनी आंदोलनास समर्थन दर्शवून सांगितले की, “जर सरकारने याचा गांभीर्याने विचार केला नाही, तर पुढील आंदोलन हे अधिक तीव्र आणि जनआक्रोशाचे रूप धारण करेल असे स्पष्ट केले. बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे वरिष्ठ पदाधिकारी मा. मोहन मुंगळे हे देखील पत्रकार परिषदेत उपस्थित होते आणि त्यांनी सुद्धा या भारत बंदलामा. एन. बी. हाटे, मा. बाळासाहेब गायकवाड, मा. सोनिया पवार, मा. मोहन मुंगळे, मा. अमोल वळंजू, मा. संजय मोरे, मा. बालाजी मसुरे, मा. नरेंद्र गजभिव, मा. अमोल पुरलकर, मा. स्वप्नील शिवमारे, मा. देवेंद्र बनसोडे, मा. अॅड. नितीन वणखडे, मा. सुनयना हांडोरे यांनी ठाम पाठिंबा दर्शविला आहे.

3/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे