आरोग्य व शिक्षणब्रेकिंग

ठाणे महानगरपालिकेकडून चालू वर्षाच्या मागणीसह थकीत पाणी बिल भरणा करणाऱ्या नागरिकांना प्रशासकीय आकारामध्ये 100 टक्के सूट : आयुक्त सौरभ राव.

[wps_visitor_counter]

संतोष पडवळ – प्रतिनिधी

ठाणे ता 30 नोव्हें : महापालिका कार्यक्षेत्रातील घरगुती वापरासाठी असलेल्या नळसंयोजनाचे थकीत देयक चालू वर्षाच्या मागणीसह एक रकमी भरणा केल्यास प्रशासकीय आकारामध्ये (दंड / व्याज) 100 टक्के सूट लागू करण्यात आली असल्याची माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक सौरभ राव यांनी आज दिली. थकीत पाणीपट्टी बिलावर 100 टक्के इतकी भरीव सवलत जाहिर करण्यात आल्याने नागरिकांना आर्थिक दिलासा मिळणार असून या योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. ठाणे महापालिकेने पाणीपट्टी वसुलीची मोहिम हाती घेतली असून जे नागरिक पाणापट्टी भरणार नाही अशा थकीत बिलधारकांचे नळसंयोजन खंडित करण्याची कारवाई करण्यात येणार आहे, तरी नागरिकांनी पाणीपट्टी भरुन महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त सोरभ राव यांनी केले आहे.

सदर योजना दि. 1‍ डिसेंबर 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत लागू राहील. वरील योजनेचा लाभ घेऊन थकीत व चालू पाणी देयकाची रक्कम पूर्णपणे भरुन त्यावरील प्रशासकीय आकारामध्ये (दंड / व्याज)100 टक्के सूट / सवलत योजनेचा लाभ नागरिक घेवू शकतील. या धोरणात्मक निर्णयापूर्वी ज्या घरगुती पाणी बील धारकांनी पाणी पुरवठा देयके जमा केली असतील अशांना सदरची सवलत योजना लागू असणार नाही. तसेच ही योजना व्यवसायिक संयोजन धारकांना लागू असणार नाही.

जे नागरिक दि.31/03/2026 आपली थकबाकीची रक्कम प्रलंबित ठेवतील अशा खातेदारांवर जप्ती कारवाई तात्काळ प्रस्तावित करुन नळ संयोजन खंडीत करणे, मिटर रुम सिल करणे व पंप जप्ती अशी कारवाई होईल असे आयुक्त यांनी यावेळी नमूद केले. या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावधी होणेसाठी प्रभाग समिती स्तरावर माहिती फलक लावण्यात यावेत व सदर योजना प्रभावीपणे राबवावी अशी सूचना आयुक्तांनी केली आहे. या योजनेचा लाभ जास्तीत नागरिकांनी घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त तथा प्रशासक सौरभ राव यांनी केले आहे.

 

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे