आरोग्य व शिक्षणब्रेकिंग

दिव्यातील कॅम्ब्रिज इंग्लिश हायस्कूलमध्ये वारी व पालखीसह आषाढी एकादशी साजरी.

[wps_visitor_counter]

 

संतोष पडवळ – प्रतिनिधी

ठाणे ता ६ जुलै : दिव्यातील कॅम्ब्रिज इंग्लिश हायस्कूलमध्ये आषाढी एकादशी मोठ्या भक्तिभावाने, उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने आज साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये अध्यात्मिक मूल्यांची जाणीव निर्माण करणे व भारतीय सांस्कृतिक परंपरेशी त्यांना जोडणे हे होते.

कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक अभंग, भजन आणि गजराने झाली. संपूर्ण शाळा परिसर भक्तिमय वातावरणाने भारलेला होता. सर्व विद्यार्थी नवीन पारंपरिक वेशभूषा आणि सिव्हिल ड्रेस परिधान करून मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. या प्रसंगी खास आकर्षण ठरले ते म्हणजे विद्यार्थ्यांच्या सहभागातून काढण्यात आलेला पालखी सोहळा वारीचा अनुभव देणारा हा पालखी सोहळा शाळेपासून सुरू होऊन थेट विठ्ठल मंदिर, दिवा येथे संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांच्या वेशात “विठ्ठल! विठ्ठल! ”चा गजर करत, झांज, लेझीम व इतर पारंपरिक वाद्यांसह सहभागी होत परंपरेचे दर्शन घडवले. विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे महत्व वारी परंपरा , संत तुकाराम व संत ज्ञानेश्वरांच्या भक्तिपंथाची शिकवण याविषयी माहिती देण्यात आली, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा या परंपरेशी अधिक जवळचा संबंध निर्माण झाला कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यात शिक्षकवृंदांचा मोलाचा सहभाग होता. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यात  मौसमी टीचर, सुपरवायझर मानसी टीचर, राहुल सर, जानवी टीचर, सोनल टीचर, ज्योती टीचर, अंजली टीचर, आशा टीचर यांचे मार्गदर्शनाने आणि परिश्रमांमुळे संपूर्ण कार्यक्रम भक्तिपूर्वक पार पडला.

शाळेचे प्राचार्य श्री. दीपक कुमार प्रसाद सर यांनी सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले व असे उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये नैतिकता, एकता आणि सांस्कृतिक समज वाढवतात असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचा समारोप सामूहिक प्रार्थना आणि प्रसाद वितरण करून करण्यात आला.

अशा प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे शाळा विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक प्रगतीबरोबरच संस्कार व मूल्य शिक्षणाची पेरणी करत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे