आरोग्य व शिक्षणब्रेकिंग

दिव्यातील आकांक्षा हॉलमध्ये जीवनविद्या मिशन आयोजित व्यसनमुक्ती अभियान संपन्न. डॉ. अशोक खवळे यांचे व्यसनमुक्त भारत या विषयावर समाज प्रबोधन

[wps_visitor_counter]

 

संतोष पडवळ – प्रतिनिधी

ठाणे, दिवा ता २१ सप्टें : जीवनविद्या मिशन, ठाणे मुलुंड ज्ञानसाधना केंद्र, दिवा उपकेंद्राच्या माध्यमातून आकांक्षा हॉल, बी आर नगर, दिवा (पू) येथे दि. २१ सप्टेंबर २०२५ रोजी व्यसनमुक्ती अभियानांतर्गत सद्गुरू वामनराव पै यांचे सतशिष्य श्री. अशोक खवळे साहेब यांचे ” शरीर साक्षात परमेश्वर आणि व्यसनमुक्त भारत ” या विषयावर जाहीर समाज प्रबोधन आयोजित करण्यात आले होते. भारत सरकारच्या व्यसनमुक्ती अभियानाअंतर्गत जीवनविद्या मिशन ने सदर मार्गदर्शनपर प्रबोधन राबविले. या माध्यमातून खवळे साहेबांनी उपस्थित युवा आणि श्रोत्यांना व्यसनमुक्तीसाठी प्रेरक मार्गदर्शन केले. जीवनविद्या मिशनच्या ज्ञानाने त्यांच्या स्वतःच्या आयष्याप्रमाणेच इतर अनेक लोकांमध्ये व्यसनमुक्ती संदर्भात जागरूकता निर्माण होऊन आतापर्यंत हजारो लोकांचे संसार सुखाचे झाले, असे त्यांनी प्रतिपादन केले.

या वेळी उपस्थित अंदाजे ५० युवांनी आणि इतर श्रोत्यांनी व्यसनमुक्तीची शपथ घेऊन राष्ट्र आणि समाजनिर्माण कार्यात सहभागी होण्याची ग्वाही दिली. या कार्यक्रमाला सुमारे ३०० लोक उपस्थित होते. या वेळी माजी नगरसेवक श्री.अशोक पाटील, जीवनविद्या मिशन ठाणे मुलुंड ज्ञानसाधना केंद्राचे अध्यक्ष श्री. सुरेश परब, सचिव श्री. दिलीप इंपाल, खजिनदार अक्षय दळवी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे