आरोग्य व शिक्षणब्रेकिंग

नेरळ येथे श्री स्वामी समर्थ महाराज जयंती उत्सव भक्तिभावात साजरा

[wps_visitor_counter]

 

नेरळ: सुमित क्षिरसागर

नेरळ, दि. २४ मार्च २०२६ – श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, नेरळ (दिंडोरी प्रणित) येथे श्री स्वामी समर्थ महाराज जयंती उत्सव अत्यंत भक्तिमय वातावरणात व उत्साहात साजरा करण्यात आला. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांनी परिसरात आध्यात्मिक उर्जेची अनुभूती निर्माण केली.उत्सवाची सुरुवात सकाळी 8 वाजता पारंपरिक भूपाळी आरतीने झाली. त्यानंतर सकाळी 10.30 वाजता नैवेद्य आरती संपन्न झाली. पुढे श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे सामूहिक पारायण आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये मोठ्या संख्येने स्वामी भक्तांनी सहभागी होत भक्तीभाव व्यक्त केला.

दुपारनंतर सायंकाळी 4 ते 7 या वेळेत भव्य पालखी सोहळा काढण्यात आला. गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेली पालखी प्रदक्षिणेची परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात पार पडली. नेरळ परिसर स्वामी नामस्मरणाने दुमदुमून गेला होता. पालखी सोहळ्यानंतर नैवेद्य आरती व भावपूर्ण भजनांनी वातावरण अधिकच भक्तिमय झाले.
या निमित्ताने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो भाविकांनी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला व प्रसाद ग्रहण केला. दरम्यान, सेवा केंद्रात नियमित धार्मिक उपक्रमही राबवले जातात. प्रत्येक गुरुवार व रविवार सायंकाळी 6.30 वाजता आरती केली जाते. तसेच रविवारी बालसंस्कार वर्ग घेऊन लहान मुलांमध्ये संस्कार, नैतिकता व अध्यात्मिक मूल्ये रुजविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केंद्रातर्फे केले जाते.एकंदरीत, हा जयंती उत्सव श्रद्धा, भक्ती आणि सामूहिक एकात्मतेचे प्रेरणादायी उदाहरण ठरला.

4.5/5 - (2 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे