ब्रेकिंग

दिवा भाजप आयोजित आरोग्य शिबिर संपन्न. डॉ. शशिकांत केळशीकर यांचा स्तुत्य उपक्रम.

0 5 1 8 8 8

 

संतोष पडवळ – प्रतिनिधी

ठाणे, दिवा ता ९ नोव्हें – भारतीय जनता पार्टी दिवा शिळ मंडळ आणि डॉ. अग्रवाल डोळ्यांचे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सदर शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी नेत्र तपासणी करून घेतली तसेच अनेक आवश्यकता असलेत्यांचे मोतीबिंदू शास्त्रक्रियेची नोंदणी करण्यात आली. सदर उपक्रमाचे आयोजन भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस शशिकांत (सतीश ) मनोहर केळशीकर यांच्या पुढाकाराने करण्यात आले.

प्रसंगी या कार्यक्रमास भाजपचे माजी ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले यांच्यासह मनोहर सुखदरे, प्रशांत कळंबटे, दिवा शीळ मंडळ अध्यक्ष सचिन भोईर तसेच कमलाकर पाटील, विनोद भगत, रोशन भगत, महिला मोर्चा अध्यक्षा सपना रोशन भगत, गणेश भगत, सीमा भगत, विजय भोईर, अशोक पाटील, नरेश पवार, रेश्माताई पवार, प्रफुलजी साळवी, नितीन कोरगावकर, रवी मुननकर, विठ्ठल गावडे, प्रकाश पाटील आदी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच दत्ता कोलते, संजय सिंग, नीलम मिश्रा, जिलाजीत तिवारी, राकेश पंडित आदी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

शिवनेरी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 8 8 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे