संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे ता १७ जुलै : दिवा स्टेशन परिसरात फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याने वाहतूक कोंडी व पादचाऱ्यांना चालणं अडचणीचं झाले आहे. परिणामी रुग्णवाहिका अडकून रुग्णांचे हाल आहेत. ठाणे पालिका प्रशासन याकडे कानाडोळा करत असल्याने भाजपाने आक्रमक भूमिका घेत गुरुवारी दिवा चौक येथे दिवा भाजपकडून जवळपास तासभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. प्रसंगी भाजपा सोबत सत्ताधारी पक्षातील मित्रपक्ष दिसून आला नाही. यावर मित्रपक्ष असून सुद्धा तो आमच्यासोबत नाही ही खेदाची बाब असल्याचे भाजप दिवा शहर मंडळाचे अध्यक्ष सचिन भोईर यांनी सांगितले.
दिव्यातील फेरीवाल्याविरोधात भाजपने गुरुवारी जनआंदोन करत जवळपास तासभर रास्ता रोको केला. ठाणे महापालिका प्रशासनाकडे दिवा स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करण्यासाठी ठोस कारवाई करा अशी मागील आठवड्यात मागणी केली होती मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर दिव्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी आज आंदोलन करत रास्ता रोको केला. प्रसंगी दिवा पोलिसांनी भाजप पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले व रस्ता मोकळा केला तदनंतर पोलीस प्रशासन व दिवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त शिवप्रसाद नागरगोजे यांनी सकारात्मक आश्वासन देत फेरीवाले आठवडा भरात हटविले जाईल असे स्पष्ट केले.
सदर आंदोलनास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व दिवा रिक्षा संगटणेने देखील पाठिंबा दिला. प्रसंगी कल्याण जिल्हा अध्यक्ष श्री नंदू दादा परब .ठाणे जिल्हा मा. अध्यक्ष संजय वाघुले , शिवाजी आव्हाड, दिवा मंडळ अध्यक्ष सचिन भोईर , ठाणे जिल्हा चिटणीस विजय भोईर, ठाणे जिल्हा कार्यकारणी सदस्य गणेश भगत, रोशन भगत , कमलाकर पाटील , ठाणे जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस सतीश कळशीकर , मंडळ सरचिटणीस समीर चव्हाण ,माजी मंडळ अध्यक्ष दिलीप भोईर , सुधाकर म्हात्रे , अंकुश मढवी , महिला मोर्चा अध्यक्ष सपना भगत , सीमा भगत , जिलजीत तिवारी ,समशेर यादव प्रफुल्ल साळवी, व्यापारी अध्यक्ष जयदीप भोईर , श्रीधर पाटील , सुदेश पाटील उ.भा मोर्चा अध्यक्ष अजय सिंग, अशोक गुप्ता , दिवा मंडळ उपाध्यक्ष धर्मेंद्र शेलार, नितीन कोरगावकर , निलेश भोईर , आशिष पाटील, सुमित मडवी , वीरेंद्र गुप्ता , ज्ञानेश्वर गावडे , सोशल मीडिया संयोजक विठ्ठल गावडे , किरण कोरगावकर , अनंता पडळकर , रवी मुननकर , अवधराज राजभर , सुरज पानसरे , मंगल राणे, पुनम सिंग, रीना सिंग, प्रिया माडभगत उपस्थित होते.



