ब्रेकिंग

दिव्यात अनधिकृत बांधकामावर हतोडा ; दिवा प्रभाग समितीचे नवनिर्वाचित सहायक आयुक्त शिवप्रसाद नागरगोजे यांची धडक कारवाई

0 5 1 8 8 8

 

संतोष पडवळ – प्रतिनिधी

ठाणे, दिवा ता २ जून : दिवा प्रभाग समितीच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने आज अनधिकृत बांधकामावर कारवाईचा बडगा उगारला आहे. ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरव राव व परिमंडळ १ उपायुक्त यांच्या आदेशानुसारकडून सदरची कारवाई दिवा प्रभाग समितीचे नवनिर्वाचित सहायक आयुक्त शिवप्रसाद नागरगोजे यांनी दिवा शहरातील प्रभाग २८ मध्ये कारवाई केली आहे.

दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त शिवप्रसाद नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली आज अतिक्रमण विभागाच्या पथकाने आज दिनांक २ जून २०२५ रोजी दिवा प्रभाग समितीच्या प्रभाग क्र. २८ मध्ये अनधिकृत बांधकाम सुरु असलेल्या इमारतीचे ग्यास कटरच्या सहाय्याने कॉलम तोडण्यात आले तसेच अनधिकृत इमारतीचे स्ल्याप ग्यास कटरने तोडण्यात आले. सदरची कारवाई शिवप्रसाद नागरगोजे सहाय्यक आयुक्त सो. दिवा प्रभाग समिती यांचे उपस्थितीत व मार्गदर्शनखाली यंत्रसामुग्री सहायाने पोलीस बंदोबस्तात अनधिकृत बांधकामावर कारवाई पोलीस बंदोबस्तत कारवाई करण्यात आली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

शिवनेरी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 8 8 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे