संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे ता १७ सप्टें : ठाण्यात बौद्ध विरासत बचाव अभियान अंतर्गत धरणे आंदोलन करण्यात आले. बौद्ध विरासत बचाव अभियान अंतर्गत राज्यभर धरणे आंदोलन आज करण्यात आले. या अंतर्गत भारत मुक्ति मोर्चा, बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्क, बहुजन क्रांति मोर्चा राष्ट्रिय पिछड़ा वर्ग मोर्चा व राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा अंतर्गत बहुजन समाजच्या मौलिक अणि सांविधानिक हक्काधिकारासाठी अणि अन्याय अत्याचाराच्या विरोधात राष्ट्रिय जन आक्रोश महारॅली व धरणे आंदोलन आयोजन घोषित करण्यात आले होते. सदर आंदोलनामधील पहिला टप्पा दि . 12 सप्टेंबर 2025 ला जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन पूर्ण करण्यात आला आहे. दि 17 सेप्टैंबर 2025 रोजी या आंदोलनाचा दूसरा टप्पा होत आहे. यादृष्टीने आंदोलन ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील शासकीय विश्राम गृहासमोर करण्यात आले.
सदर आंदोलनाद्वारे सर्व निवडणुका बैलट पेपरद्वारे घेण्यात याव्या, OBC ची जातिआधारित जनगणना करण्यासाठी आदिवासी समुदायवर वाढत्या अन्याय अत्याचारविरोधात, मुस्लिम समुदायची होणाऱ्या मोब लिंचिंग अणि अत्याचारविरोधात sc, st , obc कर्मचाराच्या नोकरीमधील पदोनोतीत आरक्षण लागु करण्याबाबत निवेदन देऊन आंदोलन करण्यात करण्यात आले. प्रसंगी आंदोलनात शैलेश सालवे, नीलेश येलवे
विशाल पडघने, सुनयना हंडोरे, कलामुद्दीन अंसारी, आशा सालवे आदी पदाधिकारी उपस्थित होते.




