गुन्हेगारीब्रेकिंग

दिव्यात अल्पवयीन दुचाकीस्वराच्या धडकेत जखमी झालेल्या वृद्धाचा अखेर मृत्यू.

0 5 1 8 8 7

 

संतोष पडवळ – प्रतिनिधी

ठाणे, दिवा ता ६ ऑगस्ट : दिव्यात दुचाकीच्या धडकेत जखमी झालेल्या वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दिवा शहरात बी आर नगर नाका येथे अल्पवयीन तरुणाच्या दुचाकीच्या धक्क्याने जखमी झालेले ६५ वर्षीय सुनील तोरणे यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. प्रकरणी अल्पवयीन दुचाकी चालक श्रवण साईराज वारेकर (वय १६) विरोधात मुंब्रा पोलीस स्टेशन अंतर्गत दिवा पोलीसांनी गुन्हा क्र 1306/2025 नुसार दाखल करण्यात आला आहे. वाढत्या लोकसंख्येच्या दिवा शहरात अनेक दुचाकी स्वार आपल्या कर्कश आवाजात भरधाव दुचाकी चालवीण्याचे प्रमाण वाढले असून अश्या दुचाकी स्वरांवर वाहतूक विभागाने तात्काळ कारवाई करावी अशी संतप्त प्रतिक्रिया दिवेकरांनी व्यक्त केली आहे.

दिवा-आगासन रोडवर बी आर नगर नाका येथे संध्याकाळी 8 वाजताच्या सुमारास भरधाव दुचाकीच्या धडकेत सुनील बळवंत तोरणे (वय 65, राहणार दिवा ) हे रस्ता ओलांडताना भरधाव दुचाकीच्या धडकेत गंभीर जखमी झाले असता डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांना मुंबईतील के ई एम हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु होते त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सदर ठिकाणी अपुरे गतिरोधक व वाहतूक पोलिसांची कमतरता तसेच अल्पवयीन बाईक स्वार यामुळे ज्येष्ठ व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. सदर भरधाव असलेल्या दुचाकीवरील तरुणा विरोधात मुंब्रा पोलीस स्टेशनचे वपोनि अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास दिवा पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक अंबादास सावंत करत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

शिवनेरी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 8 8 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे