महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या डिजिटल मीडिया ठाणे शहर अध्यक्षपदी अमित जाधव.
समाजसेवक नाणजीभाई ठक्कर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान.
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे ता १७ मे : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची नुकतीच ठाणे शहर जिल्हा कार्यकारणी प्रदेश सरचिटणीस यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली. प्रसंगी ठाणे शहर जिल्हा नव नियुक्त कार्यकारणीच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र संघाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे, समाजसेवक नानजीभाई ठक्कर, ठाणावाला, प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव तसेच संघाचे नवीमुंबई अध्यक्ष दशरथ जाधव यांच्या उपस्थित देण्यात आले. प्रसंगी ठाणे जिल्हा शहर सचिव संतोष पडवळ यांच्या शिफारशीवरून दिवा शहरातील अमित जाधव यांची ठाणे शहर जिल्हा डिजिटल मीडिया अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेच्या ठाणे शहर व जिल्हा कार्यकारणीत गेली सात ते आठ वर्षे सक्रिय सहभाग घेऊन संघटनेच्या माध्यमातून अनेक उपक्रमात हिरहिरीने कार्य करत तसेच डिजिटल युगात बातम्याचा उत्कृष्ट हातखंडा असून बेधडक ठाणे न्यूज या माध्यमातून उल्लेखनीय कार्य करीत आहे याचीच दखल घेऊन त्यांची पदनियुक्ती करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यातील समाजसेवक नानजी भाई ठक्कर यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र व ओळखपत्र देऊन जबाबदारी देण्यात आली प्रसंगी सर्व पत्रकार मित्र, परिवार व नातेवाइक यांनी शुभेच्छा देत जाधव यांचे अभिनंदन केले.
