ठाकरे शिवसनेचे ॲड. रोहिदास मुंडे यांची उपजिल्हाप्रमुखपदी नियुक्ती.

संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे , दिवा ता २५ एप्रिल : कल्याण लोकसभा क्षेत्रात शिवसेना पक्ष संघटनात्मक बांधणीला वेग देत महत्त्वपूर्ण नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने तसेच कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत यांच्या सूचनेनुसार ॲड. रोहिदास बामा मुंडे यांची उपजिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्तीमुळे शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून संघटनात्मक कामकाजाला नवचैतन्य मिळणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. ॲड. रोहिदास मुंडे हे सामाजिक, राजकीय व जनसंपर्क क्षेत्रात सक्रिय असून पक्ष संघटना बळकट करण्यासाठी ते प्रभावीपणे कार्य करतील, असा विश्वास वरिष्ठ नेतृत्वाने व्यक्त केला आहे.
नियुक्तीनंतर ॲड. रोहिदास मुंडे यांनी पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष नेतृत्व तसेच संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत यांचे आभार मानले. पक्षाने दिलेल्या जबाबदारीचे प्रामाणिकपणे पालन करून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि शिवसेना संघटना अधिक मजबूत करण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या नियुक्तीचे विविध स्तरातून स्वागत होत असून कल्याण लोकसभा क्षेत्रात शिवसेनेची ताकद आणखी वाढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.



