ब्रेकिंगराजकिय

कर्जत तालुक्यात परिवर्तन विकास आघाडीनी उडवला महायुतीचा धुव्वा…. भगवान चंचे यांचे नाव पंचायत समिती सभापती पदा करीता आघाडीवर

[wps_visitor_counter]

 

नेरळ : सुमित क्षिरसागर

नेरळ दि.११ फेब्रुवारी.
संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये कर्जत मतदारसंघ वगळता अन्य मतदारसंघांमध्ये शिंदे गटाच्या शिवसेनेने जोरदार बाजी मारत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर घवघवीत यश मिळवले आसल्याने, त्या त्या तालुक्यांमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या विजयाची चर्चा जोरदार सुरू आहे. मात्र अगदी या उलट चित्र हे कर्जत तालुक्यात असून, अजित पवार राष्ट्रवादी गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या परिवर्तन विकास आघाडीने सहा जिल्हा परिषद गटांच्या व पंचायत समितीच्या १२ जागांपैकी १० जागांवर घवघवीत यश मिळवूनही त्यांच्या यशांच्या चर्चेपेक्षा कर्जत तालुक्यात शिवसेना शिंदे पक्षाच्या विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांच्या दारुण पराभवाची चर्चा अधिक जोरदार सुरू आहे.

कर्जत तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गट व १० पंचायत समिती गणांची पार पडलेली निवडणूक ही शिवसेना शिंदे, भाजपा, शेतकरी कामगार पक्ष व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या महायुतीच्या माध्यमातून शिवसेना शिंदे पक्षाचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांच्या मुख्य नेतृत्वाखाली लढवली गेली होती. मात्र या युतीतील घटक पक्षांपैकी भाजप पक्ष हा माणगाव तर्फे वरेडी या जिल्हा परिषद गटाच्या जागेवर अग्रही असताना, मात्र सहा गटाच्या जागांवर शिवसेना शिंदे पक्षानी आपले उमेदवार उभे केले त्यामुळे युती असताना भाजपाच्या एका गटाने माणगाव तर्फे वरेडी या जिल्हा परिषद गटाच्या जागेवर आपला उमेदवार उभा केला असल्याने, व महायुती म्हणून उकरूळ, नेरळ व दामत या तीन पंचायत समिती गणाच्या जागा या भाजपाचे उमेदवारांसाठी सोडल्याने, माणगाव तर्फे वरेडी या जिल्हा परिषद गटामध्ये भाजप पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली संग्रम व गटबाजीची स्थिती त्यामध्येच माणगाव तर्फे वरेडी या जिल्हा परिषद गटामध्ये भाजपा उमेदवार उभा असल्याने, याचा थेट फटका हा शिवसेना शिंदे पक्षाच्या उमेदवाराला पडल्याने शिवसेना शिंदे पक्षाच्या उमेदवारा पडल्याने कमी मताने झालेला पराभव व सत्ताधारी विद्यमान आमदार यांनी परिवर्तन विकास आघाडीच्या नेत्यांच्या विरोधात दागलेल्या आरोपांच्या तोफा यांचा उलट परिणाम झाल्याने तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गटाचे जागांवर शुन्य तर १२ पंचायत समिती पैकी घटक पक्षा पैकी एक जागेवर शेकाप व एका जागेवर शिवसेना शिंदे पक्षाला विजयावर नामुशीकी ओडवल्याची चर्चा ही निकालानंतर कर्जत तालुक्यात सुरू आहे.

या निवडणूकीमध्ये शिवसेना उबाठा पक्षाच्या नेरळ, माणगाव तर्फे वरेडी या दोन जिल्हा परिषद गटातील विजयी उमेदवारांना मिळालेल्या एकूण मतांची संख्या ही २२०२५, तर तीन पंचायत समिती गणातील विजयी उमेदवारांच्या एकूण मताची संख्या ही १७,६५० आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चार जिल्हा परिषद गटातील विजयी उमेदवारांना मिळालेल्या मतांची एकूण संख्या ही ४५६९१, तर सात पंचायत समिती गणातील विजयी उमेदवारांच्या एकूण मतांची संख्या ही ४७,६३५ आहे. तसेच साहा जिल्हा परिषद गटातील शिवसेना शिंदे पक्षाच्या पराभूत उमेदवारांना मिळालेली एकूण मतांची संख्या ५५३५९, तर सहा पंचायत समिती गणातील पराभूत उमेदवारांना मिळालेली एकूण मतांची संख्या ही ३२,५०९ आहे. भाजपाच्या एका जिल्हा परिषद गटाचे जागेवरील पराभूत उमेदावाराला मिळालेली मते ही ५०७८, तर दोन पंचायत समिती गणातील पराभूत उमेदवारांना मिळालेली मतांची संख्या ही ६२९९ इतकी आहे. व शेकाप दोन पंचायत समिती गणातील एक पराभूत व एक विजयी उमेदवारांना मिळालेल्या मतांची संख्या ही १०५८५ इतकी आहे.

या आधी कर्जत पंचायत समितीवर शिवसेना फुटी पूर्वी शिवसेनेचा सभापती होता, मात्र अनेक वर्षाच्या असलेल्या प्रशासकीय कारभारा नंतर सन २०२६ मध्ये नुकतीच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष व शिवसेना उबाठा पक्षाच्या प्रणित परिवर्तन विकास आघाडीने जिल्हा परिषद गटाच्या सहा जागांवर ६-० व पंचायत समिती गणाच्या बारा जागांपैकी १०- २ असा विजय मिळवत महायुतीच्या उमेदवारांचा धुवा उडवला असल्याने, कर्जत पंचायत समिती वरती परिवर्तन विकास आघाडी एक हाती सत्ता काबीज केली आहे. तर कर्जत पंचायत समितीच्या सभापती पदाचे आरक्षण पाहाता सभापती पदा करीता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेरळ पंचायत समिती गणातील विजयी उमेदवार भगवान चंचे यांच्या नावाची चर्चा सध्या तालुक्यात सुरू आहे.

3/5 - (2 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे