ब्रेकिंगमहाराष्ट्र

मरणयात्रा थांबवा आणि दिवा-मुंबई लोकल तात्काळ सुरु करा – अमोल केंद्रे. अन्यथा २१ ऑगस्ट पासून उपोषणास बसणार

[wps_visitor_counter]

 

संतोष पडवळ – प्रतिनिधी

ठाणे, दिवा ता १० जून : कालच लोकल आपघातात १३ जण खाली पडल्याने ४ निष्पाप जणांचा जीव गेले तरीही निर्लज्ज प्रशासन लोकल फेऱ्या वाढवण्या बाबत किंवा दिवा ते CSMT लोकल चालू करण्याबाबत उदासीन का? आणखी किती जीव जाण्याची वाट पाहत आहे ? असा संतप्त सवाल दिव्यातील समाजसेवक अमोल केंद्रे यांनी केला आहे. निवडणुकीच्या वेळी उद्घाटन करून काय साध्या करणार आहात ? नागरिकांच्या जीवाच्या पेक्षा तुम्हास निवडणूक महत्वाची आहे का ? दिवा हे जंक्शन असूनही सर्व फास्ट लोकल दिवा येथे का थांबत नाहीत ? २०१४ पासून शेकडो निष्पाप नागरिकांनी रेल्वे अपघातात जीव गमावला. दररोज लोकल आपघातात एक दोन जीव जातात त्यांना आर्थिक मदत का दिली जात नाही ? दिवा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ( CSMT) लोकल सुरु करण्यासाठी तसेच जलद लोकल थांबण्यासाठी अनेक वर्षापासून केंद्रे यांचा लढा सुरू आहे. निवेदन दिली स्वाक्षरी मोहीम घेतली, मोर्चा काढला ७ दिवस आमरण उपोषण केले. त्यावेळी कुठे होते स्टंटबाज राजकीय नेते? निवडणूक आली की लोकल चालू होणार आम्ही करणार फक्त आश्वासन. लोकसभा निवडणूक वेळी खासदार साहेबांनी लोकल चालू होणार दिवा वासीयांचे स्वप्न पूर्ण होणार असल्याचे सांगितले. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत तर सर्वच राजकीय पक्षांनी लोकल चालू करण्याचे सांगितले होते. निवडणूक संपली आणि नेते राजकीय पक्ष शांत झाले. आता अचानक जाग आली ती दिवा मुंब्रा येथील दुर्घटना झाल्यामुळे.

रोज निष्पाप नागरिक लोकल मधून प्रवास करताना पडून मृत्युमुखी पडतात त्यांचे का कोणी सांत्वन केले नाही. त्यांना का आर्थिक मदत केली नाही. सर्वच राजकीय नेते ९ जून सारखी दुर्दैवी घटना घडल्यावर जागे होत असतील तर हे खूप मोठे दुर्दैव म्हणावे लागेल. दुर्दैवी अपघात होऊ नये यासाठी लोकलच्या फेऱ्या वाढवणे गरजेचे आहे. दिवा ते CSMT लोकल तत्काळ चालू केली तरच नागरिकांचे जीव वाचतील. विद्याविहार स्टेशन, घाटकोपर, डोंबिवली येथून लोकल चालू होऊ शकते तर दिवा हे जंक्शन आहे होम फलाट तयार असताना येथून लोकल का सुरू होत नाही ?अपघातात ज्यांचे जीव गेले त्यांना खरी श्रद्धांजली द्यायची असेल तर लोकलच्या फेऱ्या वाढवून दिवा ते CSMT लोकल तत्काळ सुरू करावी. अन्यथा २१ ऑगस्ट २०२५ पासून दिवा शहरातील माता भगिनी वडीलधारे प्रवासी बांधवांच्यासाठी परत उपोषणास बसणार असल्याचे समाजसेवक अमोल धनराज केंद्रे यांनी संतप्त प्रतिक्रिया देत स्पष्ट केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे