आरोग्य व शिक्षणब्रेकिंग

पोलिस रेझिंग डे ‘ निमित्ताने विद्यार्थ्यांनी अनुभवली खाकीची कार्यपद्धती…. नेरळ पोलिस ठाण्यात ‘ रेझिंग डे ‘ साजरा

0 5 1 8 8 8

 

नेरळ: सुमित क्षिरसागर

नेरळ: ९ जानेवारी हा दिवस संपुर्ण महाराष्ट्रात पोलिस स्थापना दिन म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने २ ते ८ जानेवारी दरम्यान रेझिंग डे हा सप्ताह पोलिसांच्या वतीने पोलीस स्थानकांच्या आवारात व शाळांमध्ये आयोजित केला जातो.या सप्ताहात विद्यार्थ्यांना कायदेविषयक व संरक्षण विषयक माहिती देऊन जनजागृती करण्याचा प्रयत्न असतो. त्याचाच एक भाग म्हणून नेरळ पोलीस ठाण्या मार्फत ’रेझिंग डे ’ चे आयोजन करण्यात आले होते.

नेरळ पोलिस ठाण्याच्या प्रांगणात गुरुवार (दि,८) रोजी पार पडलेल्या सप्ताह वेळी नेरळ पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल वरोटे यांनी विद्यार्थ्यांना ‘ रेझिंग डे ‘ विषयी माहिती दिली आणि विद्यार्थ्यांना वाईट प्रवृत्तीपासून दूर रहा व मुलींना आपले स्व संरक्षण स्वतः कसे करता येईल याचा सल्ला दिला. नेरळ पोलीस ठाण्यात पोलिस अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना पोलिसांकडे उपल्ब्ध असलेल्या विविध शस्त्र व इतर साठ्यांची अभ्यासपूर्ण माहिती देऊन त्यांचा शंकांचे निरसन केले. नेरळ विद्या मंदिर महाविद्यालयात जाऊन महिला व बाल सुरक्षा, वाहतुकीचे नियम, सायबर सुरक्षा जनजागृती या विषयांवर विद्यार्थांना मार्गदर्शन केले.

जानेवारी महिन्याचा सुरवातीला राज्य पोलिस दलात तर्फे ‘ रेझिंग डे ‘ हा उपक्रम राबविला जातो. माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी २ जानेवारी या दिवशी राज्य पोलिस दलास ध्वज प्रदान केला होता. या सप्ताहाचा समारोपाचा निमित्ताने नेरळ विद्या मंदिर महाविद्यालया ते नेरळ पोलिस ठाणे विद्यार्थी व पोलिस यांनी रॅली काढून जण जागृती केली. या कार्यक्रमास नेरळ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे सर, पोलीस उपनिरीक्षक पांगे मॅडम, पोलीस उपनिरीक्षक नितीन मंडलिक , पोलीस उपनिरीक्षक किसवे, गोपनीय अमलदार मेटकरी, नितीन अहिरे व नेरळ पोलिस ठाण्याचे कर्मचारी आणि नेरळ विद्या मंदिर महाविद्यालयाचे शिक्षक उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

शिवनेरी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 8 8 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे