दिव्यातील कॅम्ब्रिज इंग्लिश हायस्कूलमध्ये लसीकरण शिबिर संपन्न.
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे ता ३१ जुलै : दिव्यातील कॅम्ब्रिज इंग्लिश हायस्कूलमध्ये लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न झाले. टी.डी. (टेटनस आणि डिफ्थीरिया) लसीकरण शिबिर यशस्वीपणे पार पडले. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने शाळेने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. हे लसीकरण ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या सहकार्याने राबवले गेले. संपूर्ण प्रक्रियेत योग्य वैद्यकीय देखरेख आणि सुरक्षा उपाययोजना सुनिश्चित करण्यात आल्या. विविध वर्गातील अनेक विद्यार्थ्यांनी पालकांच्या संमतीने लस घेतली.
या शिबिरास शाळेचे प्राचार्य सचिव दीपक कुमार प्रसाद, अध्यक्ष संतोष पांडे, शाळेच्या सौ. मौसमी कनोजिया, पर्यवेक्षिका मंशी विश्वकर्मा तसेच शिक्षकवर्ग आणि शिक्षकेत्तर कर्मचारी, राहुल जोगदंड, पूजा टीचर, आशा टीचर, जान्वी टीचर या सर्वांनी शिबिरास मोलाचे योगदान दिले. पालकांनी शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक केले आणि मुलांच्या आरोग्य रक्षणासाठी उचललेल्या पावलांचे स्वागत केले. शाळेचा हा उपक्रम प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेच्या प्रसारासाठी आणि विद्यार्थी व पालकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला. कैम्ब्रिज इंग्लिश हायस्कूलचे प्राचार्य यांनी आरोग्य कर्मचारी, शाळेतील शिक्षकवर्ग आणि पालकांचे मनःपूर्वक आभार मानले आणि शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले.




