आरोग्य व शिक्षणब्रेकिंग

दिव्यात स्वातंत्र्यदिनी मोफत आरोग्यशिबीर व वह्या वाटप. भाजप युवा मोर्चाचे डॉ. सतीश केळशीकर यांचे आयोजन.

0 5 1 8 8 9

संतोष पडवळ – प्रतिनिधी

ठाणे ता १५ ऑगस्ट : दिवा शहरातील भाजप युवा मोर्चाचे ठाणे जिल्हा सरचिटणीस डॉ. सतीश केळशीकर यांच्या आयोजनाने स्वातंत्र्यदिनी मोफत आरोग्यशिबीर व शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आले. देवांशी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल (दिवा) यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसंगी मोफत मेडीकल आणि हेल्थ चेकअप कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. प्रसंगी हृदयरोग सल्ला व तपासणी (ECG), आस्थिरोग सल्ला व तपासणी, मधुमेह सल्ला व तपासणी, पोटाचे विकार सल्ला व तपासणी, स्त्रीरोगतज्ञ विषयक सल्ला व तपासणी करण्यात आले. मधुमेहचे औषधे मोफत दिली गेली. प्रसंगी असंख्य लोकांनी आपला सहभाग नोंदवला असून संपूर्ण शारीरिक तपासणी आरोग्य शिबीरात मोफत करण्यात आली. सदर आरोग्य शिबिराचे आयोजन केळशीकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले होते. प्रसंगी दिवा शहरातील अनेक गरजू शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप देखील करण्यात आले.

प्रसंगी सदर शिबीरास भारतीय जनता पार्टीचे सचिन भोईर (दिवा शीळ मंडळ अध्यक्ष) विजय भोईर, सपना भगत (दिवा शीळ महिला मोर्चा अध्यक्षा ), रोशन भगत, अशोक पाटील, रामराज मिश्रा, नितीन कोरगावकर, रवी मामुणकर, विठ्ठल गुरव, गणेश भगत, विनोद भगात, संजय सिंग, कमलाकर पाटील, तेजस पास्टे, दत्तात्रय कोलते, रिया मोरे, साधना सिंग तसेच डॉ. पल्लवी जाधव ( देवांशी मल्टीस्पेसियालिटी हॉस्पिटल दातीवली ) आदी मान्यवर उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

शिवनेरी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 8 8 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे