दिव्यातून गणेशउत्सवा निमित्ताने शहरप्रमुख रमाकांत मढवी यांसकडून भगवा झेंडा दाखवत ११७ मोफत एस टी बस रवाना.
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे ता २५ ऑगस्ट : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून व खासदार डाँ.श्रीकांत शिंदे यांच्यातर्फे गणेशोत्सवानिमीत्त सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, सांगली, सातारा आणि कोल्हापूर येथे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोफत ११७ एसटी गाड्या सोडण्यात आल्या असून आज सायंकाळी ठाण्याचे मा. उपमहापौर रमाकांत मढवी यांसकडून भगवा झेंडा दाखवत ११७ एस टी बस रवाना करण्यात आल्या. गेल्या वर्षी ८५ एस टी बस गाड्या सोडल्या होत्या. यंदा ११७ एस टी बस गाड्या सोडल्याने सर्वाधिक गणेशभक्तांनी या एसटी सुविधेचा लाभ घेतला आहे. प्रसंगी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. मा. उपमहापौर रमाकांत मढवी यांनी एसटी चालकांना प्रवाश्यांना सुरक्षित नेण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कोकणात जात असताना प्रवासाचा सुखद प्रवासाचा प्रश्न आहे. या काळात ट्रेन हाउसफुल्ल होत असल्याने तासनसात उभ्याने प्रवास करण्याशिवाय पर्याय नसतो. मुलाबाळांसह प्रवास करण्यासाठी जिकरीचे प्रयत्न करावे लागतात. कोकणातील बांधवांच्या या समस्या लक्षात घेवून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डाँ.खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नामुळे व शिवसेना दिवा शहर यांच्या नियोजनामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी ११७ एसटी महामंडळाच्या बसेस सोडण्यात आल्या आहेत. एकूण पाच हजार पेक्षा जास्त प्रवाशांनी या एसटी सेवेचा लाभ घेतला आहे. प्रसंगी मा. उपमहापौर रमाकांत मढवी, मा.नगरसेवक शैलेश पाटील, गणेश मुंडे, अँड.आदेश भगत, मा.नगरसेवक अमर पाटील, दिपक जाधव, मा. नगरसेविका दिपाली भगत, उमेश भगत, मा. नगरसेविका दर्शना म्हात्रे, चरणदास म्हात्रे, गुरुनाथ पाटील, युवतीप्रमुख कु. साक्षी मढवी, निलेश पाटील, अर्चना पाटील, भालचंद्र भगत आदींसह विभागप्रमुख, शाखाप्रमुख, उप विभाग प्रमुख व शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित होते.




