आरोग्य व शिक्षणब्रेकिंग

टाळ मृदंगाच्या गजरात आर्य गुरुकुल इंग्लिश स्कुल दातीवली मध्ये देवशयनी आषाढी एकादशीचा सोहळा

[wps_visitor_counter]

संतोष पडवळ ( प्रतिनिधी)

 

ठाणे, दिवा  ता ६:जुलै : आर्य गुरुकुल इंग्लिश स्कूल, दातीवली येथे देवशयनी आषाढी एकादशी निमित्ताने एक भव्य व भक्तिमय सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये भारतीय परंपरा, भक्तीभाव आणि सामाजिक शिस्त यांची जाणीव निर्माण व्हावी, या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात भगवान श्रीविठोबा-रुक्मिणीच्या प्रतिमेची पूजेने झाली. तसेच विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषा करून भजन, अभंग आणि टाळ-मृदंगाच्या गजरात दिंडी मिरवणूक सादर केली. “ज्ञानोबा-तुकाराम” च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हालेला दिसून आला.

या दिंडीत विद्यार्थ्यांनी विठोबा-रुक्मिणीची पालखी फुलांनी सजवून मोठ्या भक्तिभावाने शाळेच्या पटांगणात फिरवली. लेझीम पथकाने सादर केलेल्या पारंपरिक नृत्यांनी कार्यक्रमात रंगत आणली. विद्यार्थ्यांनी ‘देवशयनी एकादशी’चे महत्त्व सांगणारी एक लघुनाटिका सादर करण्यात आली

कार्यक्रमात चातुर्मास, साधना, संयम, उपवास व पर्यावरणपूरक जीवनशैली या विषयांवर शिक्षकांनी प्रभावी मार्गदर्शन केले. त्यांनी धार्मिक परंपरांच्या वैज्ञानिक बाजू समजावून सांगितल्या, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन व्यापक झाला.

शाळेचे सर्वेसर्वा ऍड. तुषार चंदर म्हात्रे यांनी विद्यार्थ्यांच्या उत्साहाचे कौतुक करत सांगितले की, “अशा कार्यक्रमांमुळे मुलांमध्ये भक्ती, शिस्त आणि सांस्कृतिक मूल्यांची रुजवण होते. ही परंपरा पुढील पिढीकडे हस्तांतरित होणे गरजेचे आहे.”

शाळेच्या मुख्यध्यापिका सौ. प्रियंका ठीकेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले, “वारकरी संप्रदाय ही केवळ भक्तीची परंपरा नसून ती शिस्त, समर्पण आणि समाजाशी जोडलेली संस्कृती आहे. विद्यार्थ्यांनी या मूल्यांना आपल्या जीवनात आत्मसात करणे गरजेचे आहे.”
कार्यक्रमाची सांगता सामूहिक आरती करून करण्यात आली. उपस्थित पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी या पवित्र दिवशी एकत्र येऊन अध्यात्मिक समाधानाचा अनुभव घेतला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका सौ प्रज्ञा पुरकर यांनी केले असून कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे शिक्षक स्वप्निल विभुते यांनी केले तसेंच कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाळेचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अतोनात प्रयत्न केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे