दिव्यातील भ्रष्टाचार करणाऱ्या रेशनिंग दुकानाचा परवाना रद्द करा – अमोल केंद्रे.
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे, दिवा ता ९ नोव्हें : रेशनिंगच्या नावाने दिवा शहरातील दुकानदार सामान्य जनतेची लूट करत असून त्यांना मिळणारे राशन कमी प्रमाणात दिले जात असून या संबंधी काही नागरिकांनी धडाकेबाज युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व समाजसेवक अमोल केंद्रे यांच्याकडे तक्रार आली असता त्यांनी सदर ठिकाणची खरी परिस्थिती जाणून घेण्यासाठी दिवा शहरातील सेंट मेरी शाळेच्या बाजूला असणाऱ्या अधिकृत शिधा वाटप दुकान. क्र.U- MUM ४८ फ ११३ येथे जाऊन पाहणी केली असता. रेशनिंग दुकानदार प्रत्येक व्यक्ती मागे १ किलो राशन कमी देत असल्याचे निदर्शनास आले. घरात पाच व्यक्ती असतील तर त्यांना दहा किलो गहू आणि पंधरा किलो तांदूळ मिळतात परंतु येते तर चक्क पाच किलो राशन कमी दिल्याचे उघडकीस आले. सदर प्रकार दिवा शहरातील प्रत्येक दुकानात सुरू असून ही जनतेची लूट थांबली पाहिजे यासाठी जनतेने हा जाब विचारून पूर्णपणे तुमच्या हक्काचे प्रत्येक व्यक्तीस मिळणारे २ किलो गहू आणि ३ किलो तांदूळ घ्यावे. जो दुकानदार देणार नाही. त्याची तक्रार रेशनिंग ऑफिस येथे करावी किंवा ८६५२१५५३२८ यावर कॉल करून संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. सदर भ्रष्टाचार बाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सोबत चर्चा करून तात्काळ लायसन्स रद्द करण्याची मागणी समाजसेवक अमोल केंद्रे यांनी केली आहे.




