क्रिडा व मनोरंजनब्रेकिंग

ठाण्यातील मानव मोरे याने क्रीडाक्षेत्रात रचला इतिहास..

[wps_visitor_counter]

 

संतोष पडवळ (ठाणे)

ठाणे ता १७ जून : ठाण्याच्या मानव राजेश मोरे या तरुण जलतरणपटूने आपल्या अपार मेहनतीने, अथक सरावाने आणि अफाट आत्मविश्वासाने इंग्लिश खाडी (English Channel) पार करून भारताच्या क्रीडाक्षेत्रात एक नवीन इतिहास रचला आहे. समुद्राचं तापमान थंड, लाटा अनियमित आणि सतत बदलणाऱ्या हवामानाचा सामना करत करत मानवने १३ तास ३७ मिनिटं अखंड पोहत ही खाडी पार केली.

मानवने त्याचे जलतरणाचे प्रशिक्षण ठाण्यातील मारोतराव शिंदे जलतरण तलाव येथे घेतलं होतं. अगदी लहानपणापासून पाण्याशी असलेली जवळीक आणि त्याच्यातली प्रचंड मेहनतीची तयारी त्याला या स्तरावर घेऊन गेली आहे. पण हे यश फक्त मानवचेच नाही तर त्याच्यासाठी परिश्रम घेणारे त्याचे मार्गदर्शक, प्रशिक्षक कैलास आखाडे सर आणि त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडणारे त्याचे आई-वडील यांचा तितकाच मोलाचा वाटा. त्याचं हे यश अनेक नवोदित जलतरणपटूंना प्रेरणा देणारं आहे. मानवने हे सिद्ध केलं आहे की चिकाटी, जिद्द आणि कठोर मेहनत असल्यास कोणतीही खाडी पार करणं अशक्य नाही. त्याच्या या ऐतिहासिक यशासाठी मनःपूर्वक शुभेच्छा व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे