ब्रेकिंगमहाराष्ट्र

ब्रेकिंग : मुंब्रा डोंगरामध्ये मध्यरात्री अडकलेल्या सर्व मुलांची सुखरूप सुटका

0 5 1 8 8 9

 

संतोष पडवळ – प्रतिनिधी

ठाणे : दिनांक २७/०७/२०२५ रोजी २२:२२ वाजताच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार (घटनेची माहिती देणारे:- मुंब्रा अग्निशमन केंद्र) दालम बंगल्याजवळ, आदिवासी पाडा, गावदेवी, मुंब्रा बायपास, मुंब्रा, ठाणे. या ठिकाणी सुमारे १५:०० वाजताच्या सुमारास आदिवासी पाडा, गावदेवी या ठिकाणी डोंगरामध्ये ०५ मुले फिरण्याकरिता गेली असता त्यांना परतीचा मार्ग न मिळाल्याने डोंगरामध्ये अडकली होती. सदर घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान ०१- रेस्क्यू वाहनासह, मुंब्रा प्रभाग समिती मधील आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी ०१- पीकअप वाहनासह व मुंब्रा पोलीस कर्मचारी उपस्थित होते. सदर घटनास्थळी कोणालाही दुखापत नाही.

सदर डोंगरामध्ये अडकलेल्या मुलांची माहिती पुढीलप्रमाणे :-

*१)* कु. सय्यद अयुब. *(पु./वय- १८ वर्षे., राहणार – अमृतनगर, मुंब्रा.)*

*२)* कु. शोएब खान. *(पु./वय- १८ वर्षे., राहणार – अमृतनगर, मुंब्रा.)*

*३)* कु. अमूर खान. *(पु./वय- १८ वर्षे., राहणार – दारूलफला मज्जिद जवळ, अमृतनगर, मुंब्रा.)*

*४)* कु. अरहान खान. *(पु./वय- १८ वर्षे., राहणार – अमृतनगर, मुंब्रा.)*

*५)* कु. मुददशीर गुफारे. *(पु./वय- १८ वर्षे., राहणार – अमृतनगर, मुंब्रा.)*

सदर घटनास्थळी डोंगरामध्ये अडकलेल्या मुलांची २३:३० वाजताच्या सुमारास अग्निशमन दलाचे जवान व स्थानिक नागरीक यांनी सुखरूप सुटका केली असून सदर मुलांना मुंब्रा पोलीस कर्मचारी यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदर माहिती मुंब्रा अग्निशमन केंद्र व मुंब्रा पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार अद्यावत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

शिवनेरी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 8 8 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे