ब्रेकिंग
पुणे – जेष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच वयाच्या ६९ व्या वर्षी निधन.
[wps_visitor_counter]
संतोष पडवळ – प्रतिनिधी
पुणे ता १६ ऑगस्ट – जेष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच वयाच्या ६९ व्या वर्षी निधन पुण्यात निधन झाले. अभिनेत्री तेजस्विनी पंडित ही त्यांची मुलगी असून ज्योती चांदेकर यांनी ‘गुरू’, ‘ढोलकी’, ‘तिचा उंबरठा’, ‘पाऊलवाट’, ‘सलाम’, ‘सांजपर्व’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं होतं. याशिवाय छोट्या पडद्यावरील ‘तू सौभाग्यवती हो’, ‘छत्रीवाली’ या मालिकांमध्येही त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. मात्र, ‘ठरलं तर मग’ मालिकेतील त्यांनी साकारलेली पूर्णा आजीची भूमिका सर्वत्र प्रचंड लोकप्रिय झाली होती. त्यांच्या निधनानंतर मालिकेच्या चाहत्यांवर सुद्धा शोककळा पसरली आहे.
[wps_visitor_counter]



