ब्रेकिंग ; अमेरिका इराण युद्ध थांबले…
नवी दिल्ली, ता ८ एप्रिल : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांनी इराणविरोधात नियोजित लष्करी कारवाई तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि फिल्ड मार्शल असीम मुनीर यांच्याशी झालेल्या सविस्तर चर्चेनंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे’, असे ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. ‘इराणने ‘हॉर्मुझची सामुद्रधुनी’ तात्काळ पूर्णपणे आणि सुरक्षितपणे व्यापारासाठी खुली ठेवण्याचे मान्य केल्यास, अमेरिका पुढील दोन आठवड्यांसाठी इराणवरील संभाव्य बॉम्बहल्ला आणि लष्करी कारवाई थांबविण्यास तयार आहे’, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.


डोनाल्ड ट्रम्प म्हणाले…
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ‘युद्धविराम’ असेल असेही स्पष्ट केले आहे. ‘अमेरिकेने आपली सर्व लष्करी उद्दिष्टे केवळ पूर्णच केलेली नाहीत, तर ती ओलांडली आहेत. इराणसोबत दीर्घकालीन शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने अमेरिका आता एका निर्णायक कराराच्या उंबरठ्यावर आहे’, असे ट्रम्प यांनी या निर्णयामागची पार्श्वभूमी विशद करताना म्हटले आहे.



